रसायनशास्त्रातून करिअरचा महामार्ग निवडा | पुढारी

आजघडीला फार्मास्युटिकल्स कंपन्या असो किंवा कॉस्मेटिक, पेय पदार्थ, औषधी, चर्मोद्योग, पॉलिमर या सर्व क्षेत्रात रसायनशास्त्र तज्ज्ञांची गरज भासत आहे. रसायनशास्त्रातून करिअरचा महामार्ग कसा निवडू शकतो, ते पाहूया. 

बेसिक सायन्स म्हणजेच पारंपरिक शास्त्र यात रसायनशास्त्राची हुकूमत अजूनही कायम आहे. अमेरिका असो जपान, त्याठिकाणी अप्लाईड सायन्सने विकास केला आहे. तत्पूर्वी बेसिक सायन्सची मजबूत पायाभरणी झाली आणि नंतरच अप्लाईल सायन्सच्या क्षेत्रात काम सुरू झाले. भारताचा विकास देखील मूलभूत शास्त्राच्या मजबुतीवरच अवलंबून आहे. आज अप्लाईड सायन्स किंवा इंटरडिसिप्लिनरी सायन्समध्ये जे काही काम होत आहे, त्यात मूलभूत शास्त्राची पायाभरणी निश्‍चितच झाली आहे. म्हणूनच रसायनशास्त्रासारखा बेसिक सायन्सचा विषय हा महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या देशाच्या विकासात कोठे ना कोठे केमिस्ट्रीचा हातभार लागला आहे. कृषी क्षेत्राशी निगडित रसायनचा मुद्दा असो किंवा मेडिसीन क्षेत्रातील नवीन औषधांचा उपयोग असो, त्यात केमिस्ट्री तज्ज्ञांची मदत राहिली आहे. आज रसायनशास्त्राशी गरज पेट्रोलसंबंधी उत्पादनापासून इंटरनेटच्या दुनियेपर्यंत भासत आहे. 

रसायनशास्त्र हे विज्ञानाचे दुसरे केंद्रीभूत क्षेत्र आहे. एकीकडे भौतिकशास्त्र आणि दुसरीकडे बायोलॉजी या विषयावर ओव्हरलॅप करते. केमिस्ट्री हा एक व्यापक विषय आहे. याचा संबंध मायक्रोस्कोपिक आणि मॅक्रोस्कोपिक या दोन्ही गुणांशी आहे. सर्वप्रकारच्या मटेरियल्स, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक, बायोलॉजिकल तसेच प्रत्येक प्रकारच्या परिवर्तन प्रक्रियेत आणि ट्रान्स्फार्मेशन आदींशी त्याचा संबंध येतो. आपण जे काही मिळवतो, ते रासायनिक प्रक्रियेतून मिळवतो. औषधी ही केमिकल्सपासूनच तयार केलेली असतात. याप्रकारच्या बहुतांश सौंदर्य प्रसाधनात केमिकलचा उपयोग केला जातो. आज या विषयाचा प्रत्येक क्षेत्रात वापर होताना दिसतो. सध्याच्या काळातील बाजार हा गरजू वस्तूंनी भरलेला आहे. मग कपडे, चप्पल असो, विविध प्रकारचे पेंटस असो, औषध निर्मिती असो या प्रत्येक ठिकाणी रसायनची गरज असते. बांधकाम क्षेत्रातही केमिस्ट्रीला मागणी आहे. तसे पाहिले तर बहुतांश उद्योग हे केमिस्ट्रीशी निगडित असणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहेत. अनेक ठिकाणी संशोधक म्हणून तर काही ठिकाणी केमिस्टच्या रूपातून तर काही ठिकाणी प्रयोगशाळेच्या कामासाठी उपयुक्‍त ठरत आहे. 

आज औषधी कंपन्या असो किंवा कॉस्मेटिक, पेय पदार्थ, औषधी, लेदर, पॉलिमर, साबण आदी उद्योग, कारभार हा संपूर्णपणे केमिस्ट्रीशी निगडित आहे. केमिकल्समध्ये अनेक प्रकारचे प्रयोग केले जात आहेत आणि त्यात रोजगाराच्या संधीही उपलब्ध होत आहेत. अशा स्थितीत आपल्याला रसायनशास्त्राची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. ही मूलभूत माहिती केमिस्ट्रीच्या मूलभूत माहितीबरोबरच बीएस्सी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याचीही संधी निर्माण करते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण करिअरसाठी कोणतेही क्षेत्र निवडू शकता. जर आपल्याला लवकर नोकरी कररायची असेल तर बीएस्सी पूर्ण करून करियर सुरू शकतो. केमिस्ट्रीत पदव्युत्तर पदवी केल्यानंतर किंवा रिसर्च करत असाल तर त्यातही रोजगाराच्या व्यापक संधी आहेत. या विषयात करिअरचा विचार केल्यास त्यात आठ ते दहा प्रमुख मार्ग पाहता येतील. त्यात अध्यापन, रिसर्च, फार्मास्युटिकल्स कंपन्या, एज्युकेशनल टेस्ट हाऊस, मेडिकल रिप्रेजेटिंव्ह, लघू उद्योग आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या ठिकाणी विद्यार्थ्यांना थेट रोजगाराची संधी उपलब्ध आहे. 

रसायनशास्त्रात बीएस्सी केल्यानंतर आपण रसायन विज्ञानव्यतिरिक्‍त बायोटेक्नॉलॉजी, बायोन्फार्मेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी, मटेरियल सायन्स आणि फूड टेक्नॉलॉजी ते एमएस्सी करू शकता. केमिस्ट्रीत बी.एस्सी केल्यानंतर आपण अ‍ॅनालिटिकल, अप्लाइड, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक, इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंटल, मेडिसिनल, पेस्टिसाईड अँड अ‍ॅग्रोकेमिकल्स, फार्माकॉलाजिकल, फिजिकल, पॉलिमर, शुगर डेअरी किंवा टेक्स्टाईल केमिस्ट्रीत एमएस्सी करू शकता. आजच्या नोकरीच्या जगात रासायनिक विश्‍लेषण इन्स्ट्रूमेंशनमध्ये प्रशिक्षित असणार्‍या संशोधनकर्त्यांची सतत गरज भासते. 

अ‍ॅटोमिक एनर्जीचा अभ्यासक्रम आपल्याला  बंगळूरच्या रिसर्च अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, आयआयएससी येथे करता येतो. अ‍ॅटोमिक एनर्जी आणि न्यूक्लिअर एनर्जीचा सध्याचा वाढता विस्तार पाहता त्यासाठी कुशल मनुष्यबळाची नितांत गरज आहे. याशिवाय फेलोशिपच्या आधारावर परदेशात उच्च शिक्षणही घेता येते. परदेशात शिकण्यासाठी इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी जीआरई आणि टॉफेल टेस्ट पास करावी लागते. 

केमिस्ट्रीत पदव्युत्तर पदवी केल्यानंतर केमिस्टच्या रूपाने रोजगाराची मोठी संधी मिळू शकते. केमिस्टची औषधी कंपन्यांपासून फूड इंडस्ट्री, ब्रेव्हरेज, वाईन, टेक्स्टाईल, पेस्टिसाईड आणि अन्य खासगी कंपन्यात गरज भासते. केमिस्ट म्हणूनच आरबीआयमध्ये नोट छापण्याशी निगडित कामातही करियर करू शकता. राष्ट्रीय मानक ब्यूरो, पुरातत्त्व विभागातही केमिस्ट्रीच्या तज्ज्ञांना करियरची संधी असते. रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रयोगशाळेत काम करण्याची मुबलक संधी मिळते. याशिवाय डीआरडीओ (डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन) च्या देखील देशभरात प्रयोगशाळा आहेत. जर आपण केमिस्ट्रीत एमएस्सी किंवा पीएच.डी. करत असाल तर शास्त्रज्ञ होऊ शकता; अन्यथा केमिस्ट्रीपासून बीएस्एसी केल्यानंतर सायंटिफिक असिस्टंट किंवा अधिकारी म्हणून काम करू शकता. भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन, ओएनजीसी, गेल यासारख्या संस्थेत तज्ज्ञांना नेहमीच मागणी राहिली आहे. सीएसआयआरच्या देशात 70 हून अधिक प्रयोगशाळा आहेत. या ठिकाणी केमिस्ट्रीतील तज्ज्ञांना काम करण्याची संधी मिळते. 

रसायनशास्त्राशी संलग्‍न अभ्यासक्रम करताना एक बाब लक्षात ठेवावी, ती म्हणजे कोणत्याही उद्योग किंवा संस्थेत आपल्या कौशल्याची पारख केली जाते. त्यामुळे प्रयोगशाळेत काम करताना आपल्या कौशल्यात विकास करण्याचा प्रयत्न करायला हवा. म्हणूनच केमिकल अ‍ॅनालिसीस म्हणजे अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्रीत सजग राहणे गरजेचे आहे. पुस्तकातून नवनवीन माहिती गोळा करणे गरजेचे आहे आणि शास्त्रीय द‍ृष्टिकोन विकसित करण्याबाबत जागरूक असायला हवे. भारतात बहुराष्ट्रीय कंपन्या ठिकठिकाणी रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंगची निर्मिती करत आहे. फार्मास्युटिकल्स कंपन्या, कॉस्मेटोलॉजिकल कंपन्या, अ‍ॅनालिटिकल केमिस्ट्रीशी निगडित प्रयोगशाळा यात सर्वाधिक रसायनशास्त्र तज्ज्ञांना मागणी आहे. देशात चार नॅशनल टेस्ट सेंटर आहेत. दिल्लीत श्रीराम सेंटर असून तेथे अ‍ॅनालिस्ट केमिस्ट्रीसाठी विद्यार्थ्यांची नेहमीच मागणी राहिली आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंगमध्ये रॅनबॅक्सी, ल्यूपिनसारख्या खासगी कंपन्या सात ते आठ लाख रुपयाचे वार्षिक पॅकेज विद्यार्थ्यांना देत आहे. 

रिसर्चशिवाय अध्यापन क्षेत्राचा विचार केल्यास शाळेतही इंजिनिअरिंग आणि अन्य कॉलेजमध्येही केमिस्ट्री शिक्षकांना मोठी मागणी राहिली आहे. आज पर्यावरण अनुकूल रसानशास्त्रांना मागणी आहे. या क्षेत्रात काम करण्यासाठी ग्रीन केमिस्ट्री लोकप्रिय होत आहे. अशीच स्थिती बायोकेमिस्ट्रीची देखील आहे. त्यात प्रावीण्य मिळवल्यास चांगले करियर होऊ शकते. त्याचवेळी मॅनेजमेंट आणि फार्मास्युटिकल्स, प्लास्टिक्स, पॉलीमर, पेट्रोकेमिकल्स, फॉरेस्ट्री, फूड प्रोसेसिंग आदी अनेक उद्योगात मार्केटिंग आणि प्रॉडक्शनचे काम करता येते. 

देशातील आणि राज्यातील नामांकित विद्यापीठ, महाविद्यालयात रसायनशास्त्रविषयक अभ्यासक्रम शिकवले जातात. याबाबत आपण ऑनलाईनवरही माहिती मिळवू शकतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news