Latest

आता जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल : संजय राऊत

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत हेही एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यानंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्‍यमांशी बाेलताना बंडखोर मंत्र्यांवर जोरदार टीका केली. जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल; पण आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून काम करणार, असे ते म्‍हणाले.

बंडखोर मंत्री पहिल्यांदा सूरत अन् नंतर गुवाहाटीला जात आहेत. कोणाला मंत्रीपद मिळणार? कोणाला काय दिले जाणार? हे सर्व सूरतमध्ये ठरवले जात आहे, असा आराेपही संजय राऊत यांनी केला. आजवर महाराष्ट्रातील मंत्र्यांवर एवढी गुलामी करण्याची वेळ आली नाही. बंडखोर मंत्र्यावर लवकरचं कारवाई केली जाईल. त्यांनी मंत्रीपदाला मुकावे लागेल, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.

ज्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शिवसेनेशी गद्दरी केली त्यापैकी कोणीही सुटणार नाही. आम्ही मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी काळजीपूर्वक पाऊले उचलत आहोत. खासदार अरविंद सावंत शिवसेनेकडून सर्व कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT