Political Meme’s
Political Meme’s : बंडखोर आमदार गुवाहाटीत, मीम्सचा ‘पाऊस’ महाराष्ट्रात…

Political Meme’s : बंडखोर आमदार गुवाहाटीत, मीम्सचा ‘पाऊस’ महाराष्ट्रात…

बंडखोर आमदार गुवाहाटीत, मीम्सचा ‘पाऊस’ महाराष्ट्रात…

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधान परिषदेच्या निवडणूका झाल्या. या निवडणुकीच्‍या निकालानंतर राज्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली. शिवसेना बंडाचा हादरा बसला. एकनाथ शिंदे यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली बंडखाेर आमदारांनी प्रथम सुरत गाठले. यानंतर ते थेट आसाममधील गुवाहाटीला गेले. गेली सहा दिवस 'सत्ता' नाट्यात सत्ताधारी आणि विराेधी पक्षांमध्‍ये आराेप-प्रत्‍याराेपांच्‍या फैरी झडत आहेत. राजकीय परिस्थितीवर बरेच जण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून व्यक्त होत आहे. त्यातीलच एक माध्यम म्हणजे मीम्स (Meme's). आता मीम्‍सच्‍या माध्यमातून बरेच नेटकरी राज्‍यातील राजकीय घडामाेडींवर (Political Meme's) भाष्य करत आहेत. पाहूया नेटकरी मीम्सच्‍या माध्यमातून कसे व्यक्त हाेत आहेत ते.

Political Meme's : साेशल मीडियावर मीम्‍सचा धुमाकूळ

माणूस एखाद्या कृतीवर व घटनेवर लेख, कविता, शेरोशायरी, फोटो, व्यंगचित्र, व्हिडिओ, म्युझिक आदी माध्यमातून व्यक्त होताे असताे. अलिकडच्या काही दिवसांमध्‍ये वेगाने एक प्रकार पाहायला मिळत आहे. तो म्हणजे मीम्‍स (Meme). याच मीम्‍सच्‍या माध्यमातून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चांगलाच भाष्य केले आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आणि विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्‍या निवडणूकांवेळी महाराष्ट्रात चांगलेच राजकीय नाट्य रंगले हाेते. यानंतर शिवसेनेच्‍या आमदारांनी बंड केले. त्यामूळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वळण मिळाले. या राजकीय परिस्‍थितीवर नेटकऱ्यांच्‍या मीम्सनी अक्षरश: धूमाकुळ घातला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड केले आहे. त्यामूळे महाराष्ट्रातील राजकारणाला एक कलाटणी मिळाली. गेले सहा दिवस राज्‍यातील राजकीय घडामाेडी कमालीच्‍या वेगावल्‍या आहेत. त्यावर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

एकनाथ शिंदे आपल्‍या समर्थक आमदारांसह गुवाहटी (आसाम) मुक्‍कामी आहेत. गेले सहा दिवस ते ४२ आमदारांसह तिथे आहेत. आसाममधील त्यांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. याचा वापर करुनही मीम्स केले जात आहेत.

राजकीय गदारोळा दरम्यानच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली. लागोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची सौम्य लक्षणे दिसु लागली. त्यावरुही नेटकऱ्यांनी केलेले मीम्स चर्चेचा विषय ठरले. सोशल मीडियावर गंमतीशीर चर्चा होवू लागली कोरोनाच खरा किंगमेकर आहे.

सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या फोन कॉलची एक कथित ऑडिओ क्लिप साेशल मीडियावर व्हायरल झाली आहे. शहाजीबापूंचा कार्यकर्त्यासोबत झालेला संवादावेळी त्यांनी म्हटलं आहे, "काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!' या शब्दांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हे शब्द वापरून नेटकऱ्यांनी मजेदार मीम्स शेअर करण्यास सुरूवात केली आहे.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावरील मीम्सही खूप व्हायरल होत आहेत.

राज्‍यात राजकीय गदारोळ सुरु असताना भाजपा नेते किरीट सोमय्या कुठे गायब आहेत. यावरूनही भन्नाट मिम्स केले आहेत. या राजकीय वातावरणा अगोदर किरीट सोमय्या व संजय राऊत यांच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी होत होत्या. पण या काही दिवसात किरीट सोमय्या मात्र दिसत नाहीत. यावर नेटकऱ्यांनी गंमतीशीर असे मिम्स बनवले आहे.

राज्‍यातील राजकीय घडामाेडींवरील मीम्‍सनी सोशल मीडियावर अक्षरश; धूमाकुळ घातला आहे. महाराष्‍ट्रातील राजकारणात काेणते बदल हाेणार यावर खल सुरु आहे. मात्र नेटकरी मीम्‍सच्‍या माध्‍यमातून सर्वांचे मनाेरंजन करत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news