Latest

AsianGames2023 : ३५ किमी चालण्याच्या शर्यतीत मंजू राणी आणि राम बाबूची कांस्य पदकावर मोहर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला आज (दि.४) पहिले पदक मिळाले आहे. मंजू राणी आणि राम बाबू यांनी ३५ किमी चालण्याच्या शर्यतीत (मिश्र संघ) कांस्यपदक पटकावले आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात एकुण ७० पदके आहेत.

संबंधित बातम्या : 

मंजू राणी आणि राम बाबू या जोडीने मिश्र ३५ किमी शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे. चीनला सुवर्ण तर जपानला कांस्यपदक मिळाले. या पदकासह भारताची एकूण पदकतालिका ७० वर पोहोचली असून भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी केली आहे. २०१८ मध्ये भारताने १६ सुवर्ण पदकासह ७० पदके जिंकली. यावेळीही भारताने १५ सुवर्णांसह ७० पदके जिंकली आहेत. अशा स्थितीत यावेळी भारताला १०० पदके मिळण्याची आशा आहे.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज ११ वा दिवस आहे. या स्पर्धेत भारताला पहिल्या दिवशी पाच, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी तीन, चौथ्या दिवशी आठ, पाचव्या दिवशी तीन, सहाव्या दिवशी आठ, सातव्या दिवशी पाच, १५ पदके मिळाली. तर आठव्या दिवशी, नवव्या दिवशी सात आणि दहाव्या दिवशी नऊ पदके मिळाली. आजही भारताला जवळपास १० पदके मिळू शकतात आणि पदकतालिकेत भारताची एकूण पदकांची संख्या ८० वर पोहोचू शकते.

भारताकडे किती पदके आहेत?

सुवर्ण : १५
रौप्य : २६
कांस्य : २९
एकूण : ७०

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT