Asian Games Squash : दिनेश कार्तिकची पत्नी दीपिकाने केले पदक निश्चित! स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक | पुढारी

Asian Games Squash : दिनेश कार्तिकची पत्नी दीपिकाने केले पदक निश्चित! स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asian Games Squash : भारतीय स्क्वॉशपटू दीपिका पलिकल (Dipika Palikal) आणि हरिंदर पाल सिंग संधू (Harindar Pal Singh Sandhu) यांच्यासह अनाहत सिंग-अभय सिंग या जोड्यांनी मंगळवारी शानदार विजय मिळवले. या विजयासह आशियाई क्रीडा स्पर्धेच्या स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या (Squash Mixed Doubles) सामन्यात या भारतीय जोड्यांनी सेमीफायनलमध्ये (Quarter Finals) प्रवेश केला.

भारतीय जोडीने उपांत्यपूर्व फेरीत फिलिपिन्सच्या जेमिका अरिबाडो आणि अँड्र्यू गारिका यांचा 2 विरुद्ध 1 गेमने (7-11, 11-5, 11-4) पराभव केला. भारतीय जोडीला फिलीपाईन्सच्या जोडीने कडवी झुंज दिली आणि पहिला गेम जिंकला. पण दीपिका आणि हरिंदर यांनी शानदार पुनरागमन केले आणि पुढेचे दोन्ही गेम जिंकून सामना खिशात टाकला. याचबरोबर या जोडीने सेमीफायनल गाठली असून भारतासाठी पदक निश्चित केले आहे. (Asian Games Squash)

दरम्यान, अनाहत सिंग आणि अभय सिंग या आणखी एका भारतीय जोडीने स्क्वॉश मिश्र दुहेरीच्या (Squash Mixed Doubles) सेमीफायनलमध्ये प्रवेश करून पदक निस्छित केले आहे. भारतीय जोडीने हाँगकाँगच्या त्झे विंग टाँग आणि मिंग हाँग तांग यांचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यातही भारताने वर्चस्व राखले. सलग दोन गेम (11-10 11-8) जिंकून प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली. हाँगकाँगने पहिल्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला मात्र भारतीयांनी कोणतीही चूक केली नाही. (Asian Games Squash)

Back to top button