Latest

Annu Kapoor : फ्रान्समध्ये अभिनेते अन्नू कपूर यांच्या साहित्यावर चोरांचा डल्ला

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) यांच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली. अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर चाहत्यांना कळवले आहे की, युरोप दौर्‍यावर असताना त्यांचे साहित्‍य चोरीला गेले. अन्नू कपूर यांनी खुलासा केला की, त्यांची बॅग, क्रेडिट कार्ड, युरो चलनाची राेकड, आयपाॅड आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. अभिनेत्याने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अन्नू कपूर यांनी सर्वांना फ्रान्समध्ये सावधपणे प्रवास करण्याचा इशारा दिला आहे. अन्नू यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर लगेचच चाहते आणि सोशल मीडिया यूजर्स या प्रकरणावर धक्कादायक प्रतिक्रिया देत आहेत. (Annu Kapoor)

हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेता अन्नू कपूरने कॅप्शनमध्ये म्हटले की, 'मी युरोपच्या दौऱ्यावर आहे. दुर्दैवाने फ्रान्समध्ये माझ्या गॅजेट्ससह माझी बॅग आणि मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत.' या व्हिडीओमध्ये अभिनेत्याने संपूर्ण कहाणी सांगितली आहे. ते म्हणाला, 'पॅरिसमध्ये बॅग चोरीला गेली होती, त्यात बरीच रक्कम आणि युरो होते. माझ्याकडे माझे आयपॅड, डायरी, क्रेडिट कार्ड होते. सर्व काही चोरून नेले. त्यामुळे फ्रान्समध्ये आल्यावर खूप काळजी घ्या. तेथे अनेक मूर्ख आणि एक नंबरचे चोर आहेत.

अन्नू कपूर यांनी व्हिडिओमध्ये पुढे खुलासा केला की, ते पॅरिसमधील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. त्यांना रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे. ते म्हणाले, 'इथे येताना खूप काळजी घ्या… माझ्यासोबत एक मोठी घटना घडली आहे. देवाचे आभार मानतो माझ्याकडे पासपोर्ट होता.'

अन्नू कपूर एक प्रसिध्द अभिनेते आहेत. ४० वर्षांहून अधिक काळ ते  टीव्ही इंडस्ट्रीसोबतच विविध हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, गायक आणि निवेदक म्हणून काम केले आहे. त्यांना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, एक फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार मिळाले आहेत.

अन्नू कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'काला पत्थर' या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अन्नू शेवटचे २०२१ मध्ये अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्यासोबत 'चेहरे'मध्ये दिसले होते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT