Latest

Amruta Khanvilkar : बेस्ट परफॉर्मन्स द्यायला अमृता खानविलकर तयार, पहा एक झलक

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तम नृत्यांगना, अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही आपला सर्वोत्तम परफॉर्मन्स द्यायला तयार आहे. ती तिचा बेस्ट फ्रेंड आशिष पाटीलसोबत डान्स परफॉर्मन्स करणार आहे. तिने या परफॉर्मन्सची झलक शेअर केलीय. यामध्ये ती उत्तम नृत्य मुद्रा सादर करताना दिसते. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटला काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने परफॉर्मन्सची झलक दाखवलीय. शिवाय आणखी एका फोटोमध्ये ती आशिष पाटील सोबत दिसतेय. (Amruta Khanvilkar)

हे फोटो शेअर करताना तिने फोटोला कॅप्शन दिलीय-Yes yes yes this weekend performing with one of the talented dear friend @amrutakhanvilkar ❤️.

या फोटोंमध्ये अमृताने लाल रंगाचे वर्क असलेले ब्लाऊज, पांढरी साडी, गळ्यात हार, कानात झुमके, बिंदी, केसांचा अंबाडा आणि त्यात गजरा, हातावर मेहंदी असा शृंगार केला आहे. तिच्या प्रत्येक अदा पाहण्यासारख्या आहेत. झलक दिखला जा या शोच्या १० व्या सीझनमध्ये ती आशिषसोबत दिसणार आहे.

अमृताचा चंद्रमुखी हा चित्रपट हिट झाला. या चित्रपटात तिच्यासोबत आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. तसेच मृण्मयी देशपांडे हिचीदेखील महत्त्वाची भूमिका होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT