Latest

Allu Arjun Wedding Anniversary : अल्लूने खास अंदाजात साजरा केला लग्नाचा वाढदिवस

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन: ­ साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा द राइज' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, 'पुष्पा द राइज' या चित्रपटाने ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.  दरम्यान, अल्लू अर्जुनने पत्नी स्नेहा रेड्डीसोबत लग्नाचा ११ वा वाढदिवस ( Allu Arjun Wedding Anniversary  ) साजरा केला आहे. वाढदिवसाचे काही फोटो अल्लूने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अल्लू अर्जुनने नुकतेच  कुटुंबासोबत आपला लग्नाचा ११ वा वाढदिवस ( Allu Arjun Wedding Anniversary  ) साजरा केला आहे. या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर त्याने शेअर केले आहेत. यातील एका फोटोत वाढदिवसाचा केक दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अल्लू अर्जुन त्याची पत्नी स्नेहा रेड्डीसह दोन मुले अयान आणि अरहा दिसत आहेत.

खास करून या फोटोत स्नेहा खाली बललेली असून अर्जुन तिच्या पाठीमागे उभे असल्याचे दिसते. अयान आणि अरहा दोन्ही मुले केक कापताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अल्लूने पत्नीला लग्नाच्या शुभेच्छा देत 'हॅप्पी ॲनिव्हर्सरी क्यूटी. ११ वर्षे एकत्र', असे लिहिले आहे. अल्लू अर्जुन आणि स्नेहा ११ मार्च २०११ रोजी लग्नबंधनात अडकले होते. त्यांची पहिली भेट कॉमन फ्रेंड्द्वारे एका पार्टीत झाली होती.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी दोघांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. अवघ्या काही तासांतच या फोटोला ७४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. यात एका युजर्सने 'तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, तुमच्यावर खूप प्रेम आहे, नेहमी असेच आनंदीत रहा' असे म्हटले आहे.

अल्लूच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या 'पुष्पा द राइज' चित्रपटाने ३०० कोंटींचा आकडा पार केला आहे. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, या चित्रपटाचा दुसरा भाग पुढच्या वर्षी २०२३ रोजी चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या 'पुष्पा पार्ट २' चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. मात्र, याबाबतची अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT