Latest

Alia Bhatt Sister : आलियाची बहीण शाहीन भट्टचा लग्नातील फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

आलिया भट्टची बहीण (Alia Bhatt Sister) आणि अभिनेत्री पूजा भट्ट विषयी आपल्याला माहिती आहे. पण, शाहीन भट्ट ही कधी प्रकाशझोतात येत नाही. आता आलियाच्या लग्नातचं ती लाईमलाईटमध्ये आलीय. आलिया आणि शाहीनचा (Alia Bhatt Sister) एक फोटो व्हायरल झालाय. या फोटोमध्ये दोघींचीही क्यूट मोमेंट क्लिक झालीय. शाहीनने आपल्या इन्स्टाग्रामव चाहत्यांसाठी हा फोटो शेअर केलाय. फोटोमध्ये दोन्ही बहिणी डोळे मिटून हसताना दिसत आहेत.

आलिया आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल रोजी पार पडले. सोशल मीडियावर सर्व फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कपूर आणि भट्ट कुटुंबातील एक-एक लोक लग्नातील फोटो शेअर करत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्नाच्या बेडीत अडकले. आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लग्नाचे जे फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, ते एखाद्या जादुई क्षणापेक्षा कमी नाहीत.

आलियाचा शाहीनसोबतचा गोंडस क्षण

वधूची बहीण शाहीन भट्ट हिनेही काही क्षण चाहत्यांसह इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो आलियासोबतचा आहे. दोन्ही बहिणी डोळे मिटून हसताना दिसत आहेत. फोटो शेअर करताना शाहीनने कॅप्शनमध्ये लिहिले की, "हाय हार्टबीट". याशिवाय आणखी एका फोटोमध्ये रणबीर कपूर त्याची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिलाही घेऊन जाताना दिसत आहे.

shaheen bhatt and alia bhatt

अलीकडेच सोशल मीडियावर आलिया भट्टने मेहंदी सेरेमनीदरम्यानचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती रणबीर कपूरसोबत रोमँटिक पोज देताना दिसली होती. हे फोटो शेअर करताना आलिया भट्टने लिहिले की, "मेहंदी ही स्वप्नांच्या पलीकडची गोष्ट होती. आजचा दिवस प्रेम, कुटुंब, आमचे सुंदर मित्र, बरेच फ्रेंच फ्राईज, मुलांचा एक सरप्राईज परफॉर्मन्स, अयानचा डीजे वाजवला गेला, मिस्टरने नियोजित केलेले मोठे आश्चर्य. कपूर (माझ्या आवडत्या कलाकाराने माझ्या आवडत्या गाण्यांवर सादर केले), एकूणच माझ्या आयुष्यातील प्रेमाने आनंदाश्रू होते, काही शांत, आनंदाचे क्षण होते. दिवस होतात… .आणि मग असे दिवस येतात."

आलियाच्या मेहंदी फंक्शनमध्ये तिच्या गर्ल गँगने धुमाकूळ घातला. अभिनेत्रीचा BFF सोबतचा फोटो जबरदस्त आहे. आलियाच्या आयुष्यातील हा सुंदर दिवस तिच्या मित्रांनी मिळून आणखी खास बनवला होता. आलियाच्या मेहंदीवर तिचे मित्र आणि कुटुंबीयांनी तिच्यावर खूप प्रेम केले. मेहंदी फंक्शनमध्ये आलियाने गुलाबी रंगाचा स्कर्ट आणि टॉप परिधान केला होता. आलियाने कुंदन आणि फुलांच्या दागिन्यांसह तिचा पोशाख कम्प्लिट केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT