Latest

Akola ZP: अकोल्यात ‘वंचित बहुजन’ विजयी, अमोल मिटकरींना दे धक्का!

रणजित गायकवाड

Akola ZP : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने २८ पैकी १६ जागांवर बाजी मारली आहे. गेल्या वीस वर्षापासून अविरतपणे जिल्हा परिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित करण्यात वंचित बहुजन आघाडीला यश मिळाले आहे. हा विजय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकरांच्या सोशल इंजिनिअरिंगचा विजय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणूक कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या २८ जागांसाठी ५ ऑक्टोबररोजी निवडणूक पार पडली. बुधवार 6 ऑक्टोबर रोजी निकाल जाहिर झाला. नेहमीप्रमाणे याही निकालात वंचित बहुजन आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला. वंचित बहुजन आघाडीने 28 पैकी 16, शिवसेना – 5,भाजपा – 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी -1,अपक्ष – 1, प्रहार -1, एआयएमआयएम -1 यांनी विजय संपादन केला आहे. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद गटात तसेच पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व पहायला मिळाले.

( Akola ZP ) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा निकाल सुरुवात झाली. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले आहे. तर वंचित मधून बंडखोरी करणारे दोन उमेदवार ही विजयी झाले आहे. या दोघांना मिळून वंचितची विजयी उमेदवारांची संख्या ही आठ वर गेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, काँग्रेसचे एक, शिवसेनेचे एक, प्रहार जनशक्ती पक्षाचे एक आणि भाजपचे एक उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीने आपली सत्ता निर्विवाद राखल्याचे दिसते.

अकोला जिल्हा परिषद : पोटनिवडणुकीत (विजयी)

एकूण जागा : 14
1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना
2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित
3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष
4) अंदूरा : मीना बावणे : वंचित
5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी
6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष
7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित
8) बपोरी : मायाताई कावरे : भाजप
9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित
10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित
11) कानशिवनी : किरणताई आवताडे/मोहड राष्ट्रवादी
12) कुटासा : स्फुर्ती गांवडे प्रहार
13) तळेगाव : संगीताताई अढाऊ वंचित
14) दानापूर : गजानन काकड काँग्रेस

असा आहे निकाल…

एकूण जागा : 14
निकाल जाहीर : 14
वंचित : 06
अपक्ष : 02
शिवसेना : 01+ प्रहार : 01
राष्ट्रवादी : 02
भाजप : 01
काँग्रेस: 01

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT