मनीष भानुशाली आणि किरण गोसावी नेमके कोण?(फोटो) | पुढारी

मनीष भानुशाली आणि किरण गोसावी नेमके कोण?(फोटो)

पुढारी ऑनलाईन डेस्क

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका मोठा क्रूझवर एनसीबीने टाकलेल्या छाप्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मनीष भानुशाली आणि किरण गोसावी या दोन व्यक्तींमुळे ही कारवाई वादात सापडली आहे. ड्रग्‍ज कारवाईवेळी सहभागी झालेल्‍या या दोन व्यक्ती नेमक्या कोण आहेत, असा प्रश्नही पडला आहे.

मनीष भानुशाली भाजपचा कार्यकर्ता

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाब मलिक यांनी केलेल्या आरोपानुसार, मनीष भानुशाली हा व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता असून त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे फोटो दिसतात. भानुशाली हे भाजपचे सक्रीय कार्यकर्ते असल्याचे दिसते. त्‍याच्‍याकडे २०१२ पर्यंत भाजपचे पद होते. मात्र,  २०१२ नंतर ताे डोबिवलीत कमी आणि दिल्लीत जास्त वास्तव्यास  हाेता. क्रूझवरील पार्टीवर जेव्हा एनसीबीचा छापा पडला तेव्हा भानुषाली हा कथित आरोपींना घेऊन जात होता. त्याच्यासोबत किरण गोसावी हा सुद्धा होता.

किरण गोसावी खासगी गुप्तहेर

शाहरूख खानचा मुलगा आर्यन याला पकडून नेत असताना त्याच्यासोबत अरबाज मर्चंट यालाही ताब्यात घेतले. त्याला घेऊन जाणारा किरण गोसावी हा खासगी गुप्तहेर असल्याचे समोर आले आहे. तो आपल्या वाहनावर पोलिस असल्याची पाटी लावून फिरत असतो. तसेच त्याने परदेशात तरुणांना नोकरी लावण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचे प्रकरणही समोर आले आहे.

एनसीबीने कारवाई केल्यानंतर किरण गोसावी आणि मनीष भानुशाली हे दोघे आत कसे गेले? त्यांना एनसीबीने ताब्यात कसे घेतले? असे प्रश्न विचारले जात आहे. किरण गोसावी याने मलेशियात हॉटेलमध्ये नोकरी देतो, असे सांगून पुण्यातील एका तरुणाला साडेतीन लाखाला फसवले होते. कसबा पेठेतील या तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

किरण गोसावी

आयोजकांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज मागविलच्या बातम्या माध्यमांत येत होत्या. एनसीबीच्या पथकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून क्रूझ ग्रीन गेटजवळ थांबले असताना छापा मारल्याची माहिती दिली गेली होती. मात्र, या छाप्यावेळी भानुषाली आणि गोसावी काय करत होते, असा सवाल मंत्री नबाव मलिक यांनी केला आहे.

हेही वाचलं का?  

Back to top button