पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी तीन #कृषी कायदे मागे घेतले त्यानंतर देशभर आनंद साजरा केला जात आहे. मात्र, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी याबाबत एक वक्तव्य केले असून हे कृषी कायदे लवकरच परत आणले जातील, असे सांगितले आहे. त्यामुळे खरोखरच हे कायदे पुन्हा आणले जातील का? याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यपाल मिश्र म्हणाले, तीन कृषी कायदे मागे घेतले ही सकारत्मक दृष्टीने उचलेले पाऊल आहे. सरकारने शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी हे कायदे रद्द करण्यावर अडून बसले. हे तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. सरकारला असे जाणवले की हे कायदे मागे घ्यायला हवेत. आता अनुकूल वेळ नाही. हे कायदे पुन्हा येऊ शकतात. शेतकरी मागे हटण्यास तयार नव्हते त्यामुळे हे कायदे मागे घेतले.
खासदार साक्षी महाराज म्हणाले, #कृषी कायदे मागे घेणे ही काही मोठी घटना नाही. कायदे आणले जातात, मागे घेतले जातात. राजेश टिकैत असू दे अगर कुणी असू द्या काहीच फरक पडत नाही. देशाचा मोदींवर भरवसा आहे. शेतकऱ्यांचा मोदींवर भरवसा आहे. मोदी जे करतील ते राष्ट्रहिताचे करतील. हिदूस्थानच्या राजकारणाने ज्यांना नाकारले आहे ते राजकारणातील पप्पू राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे नाव घेण्याचे औचित्य नाही. कुणात जर ताकद आहे तर २०२२ समोर आहे. मैदानात या आणि लढा. अखिलेश यादव पिसाळलेल्या माजरासारखे खांब कुरतडत आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :