उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला अवधी असला तरी राजकारणात रंगत येत असून सोनिया गांधी यांच्या रायबरेली या मतदारसंघातील काँग्रेसच्या आमदार आदिती सिंह (mla aditi singh) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा काँग्रेससाठी धक्का मानला जात आहे. आदिती सिंह mla aditi singh यांच्याबरोबर आजमगढमधील बसपाच्या सगडी विधानसभा मतदारसंघातील आमदार वंदना सिंह यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्यासमवेत भाजपचे नेते उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून आदिती सिंह यांची भाजपशी जवळीक वाढली होती. शेतकरी आंदोलनावरून प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली. आदिती यांचे पती अंगद हे पंजाबधील नवाशहर येथील आमदार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा रायबरेली हा हक्काचा मतदारसंघ मानला जातो. काँग्रेसचे मोठे नेते असलेले अखिलेश सिंह यांच्या जागेवर २०१७ मध्ये आदिती या आमदार झाल्या होत्या.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून mla aditi singh भाजपच्या जवळ होत्या. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले होते. अखिलेश सिंह हे पाचवेळा या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार होते. २०१९ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर आदिती यांनी भाजप सरकारच्या अनेक निर्णयांचे स्वागत करत कौतुक केले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. अखेर त्यांनी पक्षाला रामराम केला.
रायबरेली हा काँग्रेसचा गड मानला जातो. येथे भाजपला नेहमीच मात मिळाली आहे. आदिती सिंह यांना भाजपमध्ये घेतल्याने तेथे भाजप खाते उघडेल असा विश्वास नेते व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी कृषी कायद्यांवरून आदिती सिंग यांनी प्रियांका गांधी यांच्यावर टीका केली होती. गांधी यांच्याकडे अन्य मुद्दे नसल्याने त्या टीका करत आहेत असे सिंग यांनी म्हटले होते.
दरम्यान, याआधी आदिती सिंह आणि राहुल गांधी यांच्या लग्नाची अफवा पसरली होती.
हेही वाचा :