Rajesh Tope : पहिली ते चौथी वर्ग सुरू होण्याचे राज्य आरोग्यमंत्र्यांचे संकेत | पुढारी

Rajesh Tope : पहिली ते चौथी वर्ग सुरू होण्याचे राज्य आरोग्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई, पुढारी ऑनलाईन

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठं सुरू करण्यामध्ये शिथिलता दिली जात आहे. महाविद्यालयं आणि पाचवी ते दहावी शाळा सुरू झाल्यानंतर आता पहिली ते चौथी शाळा सुरु होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहेत.

एका वृत्तवाहिनीशी राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, “पहिली ते चौथीतील सर्व विद्यार्थ्यी शाळेत आले पाहिजेत. तसेच त्यांचे लसीकरण झाले पाहिजे. १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात यावे, हा मुद्दा मांडला गेला आहे. तसेच पहिली ते चौथी शाळा सुरू करण्याची परवानगी द्यावा, असाही मुद्दा मांडला आहे. उद्या त्यासंदर्भात कॅबिनेटची अंतिम बैठक आहे, त्यात निर्णय होण्याची शक्यता आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिले आहे.

टोपे यांनी पुढे सांगितले की, “राज्यात सध्या ७०० ते ८०० रुग्ण सापडत आहेत. त्यात बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे. कोरोनाने मुलं जास्त प्रमाणात आजारी पडले आहेत, असंही दिसत नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचं कारण नाही”, असंही राजेश टोपे यांनी सांगितले.

बूस्टर डोससंदर्भात बोलताना टोपे म्हणाले की, “ज्यांना कोरोनाची लस देऊन वर्षं झालेले आहे. त्यांना बूस्टर डोस देण्यात यावा, अशीही मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. नाट्यगृह, सिनेमागृहांना आता ५० टक्के परवानगी दिली आहे. ही परिस्थिती सुधारली निर्बंधाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात येईल. त्यावर मुुख्यमंत्री निर्णय घेतील”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

पहा व्हिडीओ : एस टी कर्मचाऱ्यांच्या पिळवणुकीला जबाबदार कोण ? | गोपीचंद पडळकर

Back to top button