Latest

शिल्पाची लेकीसोबत रांगोळी; संस्कृती शिकवत आहात याचा अभिमान…

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते. परंतु, सध्या चित्रपटाच्या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून तिने धुमधडाक्यात दिवाळी पार्टी एन्जॉय केली आहे. या पार्टीतील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मात्र, शिल्पा तिच्या मुलांसोबत रांगोळी काढताना हटके दिसतेय.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने काल रविवारी रात्री धमाकेदार दिवाळी पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीत अनिल कपूर, शमिता शेट्टी, रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसूझा, एकता कपूर, आर्यन खान यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. मात्र, याच दरम्यान शिल्पा शेट्टी पार्टीच्या काही तास आधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. यात येलो रंगाच्या चुडीदारमध्ये घराच्या दारात रांगोली काढताना दिसतेय.

या व्हिडिओत शिल्पा तिची लेक समीशा शेट्टी आणि मुलगा वियानसोबत रांगोळी काढताना दिसली. यात शिल्पा शेट्टी एका पाटावर बसली असून तिच्या बाजूला समीशा आहे. यात शिल्पाने रांगोळी काढण्याचा छाप हाताने जमिनीवर धरला आहे. तर समीशा त्याच्यावर रांगोळी पसरवताना दिसतेय. तर दोघीसोबत मुलगा वियान असून तोदेखील रांगोळी काढत आहे. यासोबत त्याच्याजवळ चार ताटात वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या ठेवल्या असल्याचे दिसतेय.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'आपल्या वार्षिक परंपरेला अनुसरून.. रांगोळी वेळ ?आली आहे. आशा आहे की, हे वर्ष तुम्हाला आरोग्याची संपत्ती, सकारात्मकतेचा प्रकाश आणि भरपूर समृद्धी लाभो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला धनत्रयोदशीच्या आणि दिवाळीच्या खूप -खूप शुभेच्छा,' असे म्हटलं आहे. हा व्हिडिओ शिल्पाने तिच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी समीशा आणि शिल्पाचं भरभरून कौतुक केले आहे. यात एका चाहत्याने 'तुम्ही तुमच्या मुलांना आमची संस्कृती शिकवत आहात याचा खरच अभिमान वाटतो, देवा तुमची दिवाळी चांगली जावो, निरोगी राहा आणि आनंदी जावो ❤️'. तर दुसऱ्या एकाने दिवालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिल्पाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, सोनल जोशी दिग्दर्शित 'सुखी' या चित्रपटात ती लवकरच दिसणार आहे. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT