Urvashi Rautela And Rishabh Pant : ‘उर्वशी-उर्वशी’ म्हणून पंतला मैदानात चाहत्यांनी डिवचले (व्हिडिओ) | पुढारी

Urvashi Rautela And Rishabh Pant : 'उर्वशी-उर्वशी' म्हणून पंतला मैदानात चाहत्यांनी डिवचले (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नाही. रविवारी (२३ ऑक्टोबर) मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात पंतच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकला संघात स्थान देण्यात आले. त्यामुळे पंत या सामन्यात खेळू शकला नाही, पण सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा होत आहे. त्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे नाव घेऊन चिडवताना दिसत आहेत. (Urvashi Rautela And Rishabh Pant)

सीमारेषेवर पंत अर्शदीप सिंगशी बोलत होता. त्यानंतर चाहत्यांनी मागच्या स्टँडवरून ‘उर्वशी-उर्वशी’ असा जयघोष सुरू केला. तो मागे वळून चाहत्यांना काहीतरी म्हणाला आणि तिथून निघून गेला. या सामन्यात अर्शदीपने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत ३२ धावा देत तीन बळी घेतले. अर्शदीपशिवाय हार्दिक पंड्याने चार षटकांत ३० धावा देत तीन धावा दिल्या. पाकिस्तानच्या संघाने २० षटकांत आठ विकेट गमावत १५९ धावा केल्या. (Urvashi Rautela And Rishabh Pant)

उर्वशी आणि पंत यांच्याबद्दल गेल्या दोन महिन्यात दोघांबाबत अनेक बातम्या समोर आल्या. कधी उर्वशी पंतला टोमणे मारताना तर कधी ऋषभ त्याला उत्तर देताना दिसली. पंत टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी उर्वशीही तिथे पोहचली. उर्वशीने काही दिवसांपूर्वी पंत यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता आणि त्यांना ‘मिस्टर आरपी (आरपी), ‘छोटू भैया’ असे संबोधले होते. यानंतर उर्वशी आशिया कप दरम्यान यूएईमध्ये दिसली होती. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानही ती स्टेडियममध्ये दिसली होती. त्यानंतर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये ती पंतची माफी मागताना दिसली.

हेही वाचा;

Back to top button