Latest

आई कुठे काय करते फेम अनिरुद्ध तुम्हाला आवडत नसला, तरी रिअल लाईफमध्ये खूप वेगळाय !

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आई कुठे काय करते या टीव्ही पडद्यावरील मालिकेत नकारात्मक भूमिका साकारून अनिरुध्दने प्रेक्षकांच्या शिव्या जरी खाल्ल्या असल्या तरी हा मोठा अभिनेता आहे. आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुध्दची भूमिका मिलिंद गवळी (Milind Gawali) या अभिनेत्याने साकारली आहे.

अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट, टीव्ही मालिका अशा माध्यमांतून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखलवीय. (Milind Gawali) शूर आम्ही सरदार, वैभव लक्ष्मी, सून लाडकी सासरची, हे खेळ नशिबाचे, आधार, सासर माझे मंदिर, काळभैरव यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. तसेच चंचल, वक्त से पहेले, हो सकता है यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Milind Gawali

मिलिंद सध्या 'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. पण, या मालिकेत त्यांची नकारात्मक भूमिका आहे. त्यामुळे मिलिंद यांना अनेकांच्या शिव्या खाव्या लागत आहेत. मात्र प्रेक्षकांनी दिलेल्या शिव्यांचं आपल्याला वाईट वाटण्याऐवजी कौतुक वाटतं, असं मिलिंद यांनी एकदा आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. तुम्हाला माहितीये का, मिलिंद मोठे अभिनेते आहेत. त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास मोठा आहे. अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ते अभिनेतेचं नाही तर दिग्दर्शक देखील आहेत.

Milind Gawali

हिंदीमध्ये त्यांनी कॅम्पस, सीआयडी, आहट, कहानी तेरी मेरी यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म १६ जून, १९६६ रोजी मुंबई, महाराष्ट्रात झाला. त्यांनी 'वक्त से पेहले' चित्रपटातून डेब्यू केला.

मिलिंद गवळी यांनी शारदाश्रम हायस्कूल, लाला लाजपत राय कॉलेज ऑफ कॉमर्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. पुढे एमकॉम करून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

बालकलाकार ते टॉपचा अभिनेता

मिलिंद यांनी बालकलाकार म्हणून 'हम बच्चो हिंदुस्तान के' चित्रपटात काम केले होते. त्यांनी हिंदी, मराठीसोबतच मल्याळम भाषांमध्येही काम केले आहे.

मिलिंद 'हळद तुझी कुंकू माझे' आणि 'ठण ठण गोपाळ' या चित्रपटाचा भाग होते. विशेष म्हणजे मिलिंद आणि अलका कुबल यांनी तर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मिलिंदने 'ही डायवा जेनिले कुणी', 'जजमेंट' आणि 'स्वीकार' यासारख्या टेलीफिल्म्समध्ये काम केले. ते मल्याळम चित्रपट 'आर्यन' मध्येही झळकले होते.

मिलिंद यांना 'स्वामी समर्थ' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी "हो सकता है", "अनुमती" आणि "हक्क" या हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

पुरस्कारांचे मानकरी

नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (एनआयएफएफ) त्यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला. मिलिंद यांना 'डिड यू नोटिस' या शॉर्ट फिल्मसाठी होनोलुलू चित्रपट महोत्सवामध्ये पुरस्कार मिळाला. 'सखा भाऊ पक्का वैरी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी त्यांना नामांकन मिळाले.

SCROLL FOR NEXT