KGF : Chapter 2 चित्रपटाचे सवांद ‘यश’ने स्वत: लिहले | पुढारी

KGF : Chapter 2 चित्रपटाचे सवांद ‘यश’ने स्वत: लिहले

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगळूर येथे आयोजित केजीएफ : चॅप्टर २ (KGF: Chapter 2) चा मेगा ट्रेलर लॉन्च इव्हेंट प्रचंड यशस्वी ठरला. यावेळी केजीएफ : चॅप्टर २ च्या संपूर्ण कलाकारांनी या कार्यक्रमात चित्रपटात काम करतानाचे त्यांचे अनुभव शेअर केले. 24 तासात केजीएफ : चॅप्टर २ च्या ट्रेलरने एका तासात 109 दशलक्ष व्ह्यूज मिळवून आणखी एक विक्रम मोडला. चित्रपटात दाखवलेली अप्रतिम सिनेमॅटोग्राफी, जबरदस्त अॅक्शन आणि कुशल दिग्दर्शन पाहून प्रेक्षक वेडे झाले आहेत.

KGF: Chapter 2

दक्षिणेचा रॉकिंग स्टार यशच्या (KGF: Chapter 2) चाहत्यांनी रॉकीच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ कॅरेक्टरवर जबरदस्त प्रतिक्रिया देऊन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या कार्यक्रमाच्या वेळी दिग्दर्शक प्रशांत नील यांनी एक वेगळीच वस्तुस्थिती यावेळी उघड केली. या केजीएफच्या सिक्वेलमध्ये अत्यंत प्रभावीपणे यश हा संवाद बोलताना दिसतो. तर दिग्दर्शकाने सांगितले की, या चित्रपटातील सर्वाधिक संवाद हे स्वत: यशने लिहले आहेत.

KGF: Chapter 2

उत्कंठावर्धक कथा, मनाला फुंकर घालणारे अॅक्शन सीक्वेन्स, आकर्षक साउंडट्रॅक आणि आकर्षक परफॉर्मन्ससह केजीएफ : चॅप्टर १ ( KGF Chapter 1) या चित्रपटाने भारतीय सिनेमातील अनेक रेकॉर्ड मोडले. यामुळेच या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये बॉलिवूडचे आघाडीचे कलाकार संजय दत्त, रवीना टंडन यांचा समावेशासह केजीएफ : चॅप्टर २ (KGF: Chapter 2) नवे विक्रम प्रस्तापित करण्यास सज्ज झाला आहे.

KGF: Chapter 2

14 एप्रिल रोजी देशभरात कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळममध्ये केजीएफ : चॅप्टर २ रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्रशांत नील यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. प्रशांत नील हे सध्या सर्वात जास्त मागणी असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. हा चित्रपट उत्तर भारतातील रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि एए फिल्म्सद्वारे सादर केला जात आहे. एक्सेलने ‘दिल चाहता है’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल धडकने दो’ आणि ‘गली बॉय’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

Back to top button