Latest

आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे अडचणीत, बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दीपक दि. भांदिगरे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; एका बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या विरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. केदार दिघे हे आनंद दिघेंचे पुतणे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार २३ वर्षीय तरुणी खासगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर आहे. ती लोअर परळमधील रेजीस हॉटेलमध्ये येणाऱ्या गेस्टना अटेंड करून क्लब मॅरेट मेम्बरशीपबाबत माहिती देण्याचे काम करते. २८ जुलैला तिला यातील आरोपी रोहित कपूर याने क्लब मेरेट मेम्बरशीप घेतो असे सांगून तिला सेंट रेजीस हॉटेलमध्ये जेवणासाठी नेले.

जेवण झाल्यानंतर मेम्बरशीपचे पैसे देण्याच्या बहाण्याने तो थांबलेल्या रुममध्ये येण्यास भाग पाडले. तरुणी त्या रुममध्ये गेली असता त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. तरुणीने घाबरुन या घटनेची वाच्यता केली नाही. परंतु, ३१ जुलैला तिने ही घटना तिच्या मित्रांना सांगितली आणि आरोपी रोहित कपूर याला व्हॉट्सअपद्वारे मॅसेज करून याबाबत जाब विचारला.

कपूर याने तिचे व्हॉट्सअप ब्लॉक केले. त्यानंतर तिने १ ऑगस्ट रोजी तिच्या मित्रां मार्फत संशयित कपूर याला पुन्हा विचारणा केली असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. संशयित रोहित कपूर याने त्याचा मित्र संशयित केदार दिघे यांच्या मध्यस्थीने पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करणेबाबत सांगितले. तक्रारदार महिलेने त्याला नकार दिला असता आरोपी केदार दिघे यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रारदार तरूणीच्या जबाबावरुन ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे संशयित रोहित कपूर आणि केदार दिघे यांच्या विरुध्द भादंवि कलम ३७६, ५०६ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT