शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे यांची निवड | पुढारी

शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुखपदी केदार दिघे यांची निवड

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्हा प्रमुपदी केदार दिघे यांची नियुक्ती केली. तसेच अनिता बिर्जे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे आली आहे.
प्रदीप शिंदे यांच्यावर ठाणे शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चिंतामणी कारखानीस यांची ठाणे विभागीय प्रवक्ते पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, केदार दिघे हे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन केला आहे; परंतु केदार दिघे यांनी शिवसेनेतच राहणे पसंत केले आहे. आता त्यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Back to top button