Latest

Chip Designing : चिप डिझायनिंगमध्ये करिअर करायच आहे? मग ‘हे’ एकदा वाचाच

मोहन कारंडे

स्वरदा वैद्य

जागतिक पटलावर सध्या सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठी स्पर्धा पहावयास मिळत आहे. भारत या चिप्सच्या (Chip Designing) विश्वामध्ये आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. अलीकडेच टाटा उद्योगसमूहाने गुजरातमधील धोलेरा येथे सेमीकंडक्टरची फॅक्टरी उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. (Chip Designing)

संबंधित बातम्या : 

आजघडीला आयबीएम, फिलिप्स सेमीकंडक्टर्स, मोटारोला, टीसीएस, एचसीएल, अनलॉग डिव्हाइसेस, लुसेंट, विप्रो, इंटेलसारख्या आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांची नजर या विभागावर आहे. तसे पाहिले तर चिप डिझायनिंग (Chip Designing) हे एक चांगले व्यावसायिक क्षेत्र असून त्यात संशोधनावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यात मेहनत करण्याची तयारी आणि शिकण्यासाठी धडपड करणार्‍या युवकांची नेहमीच गरज लागते. प्रतिभावंत युवकांसाठी याठिकाणी रोजगारांची चांगली संधी उपलब्ध आहे. कारण, बाजाराच्या मागणीच्या तुलनेत देशातील सर्वच आयआयटी आणि एनआयटीतून सध्या केवळ एक चतुर्थांश एवढेच इंजिनिअर्स पासआऊट होत आहेत. (Chip Designing)

चिप इंडस्ट्रीत (Chip Designing) रोजगाराची चणचण आजही नाही आणि भविष्यातही जाणवण्याची शक्यता नाही. कारण, कोणत्याही कंपनीत चिप तयार करण्याचे पूर्ण काम डिझाईन, प्रॉडक्शन, टेस्टिंग, अ‍ॅप्लिकेशन आणि प्रोसेस इंजिनिअरिंगसारख्या अनेक भागात विभागले जाते. त्यामुळे येथे मोठ्या संख्येने हुशार अभियंत्यांची सातत्याने मागणी असते. कंपनीचे अनुभव आणि दक्षतेच्या आधारावर आर्किटेक्चर डिझाईन टीम, सर्किट डिझाईन टीम, फिजिकल डिझाईन टीम, टेस्टिंग किंवा व्हेरिफिकेशन डिझायनिंग विंगमध्ये चिप, व्हीएलएस आय डिझाईन इंजिनिअर, प्रॉडक्ट इंजिनिअर, टेस्ट इंजिनिअर, अ‍ॅप्लिकेशन किंवा सिस्टीम इंजिनिअर, प्रोसेस इंजिनिअर, पॅकेजिंग इंजिनिअर होऊ शकतो.

आयटी कंपन्यांत सर्वसाधारणपणे डिझायनिंग इंजिनिअरच चिप डिझायनिंगची भूमिका बजावत असतात, ज्या ठिकाणी त्यांचे मुख्य काम लहान-मोठे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची कार्यक्षमता वाढविणे होय. यासाठी असे प्रोफेशनल्स इंटिग्रेटेड सर्किट म्हणजेच चिप तयार करण्याचे काम करत असतात. आजकाल चिपचे आधुनिक रूप व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन (व्हीएलएसआय) आहे. सिलिकॉनचा हा पातळ आणि छोटासा तुकडा इंटिग्रेटेड सर्किट बेसचे काम करतो. व्हीएलएसआय डिझायनिंगची नामांकित कंपन्यांत चांगली मागणी आहे.

Chip Designing : अभ्यासक्रम आणि पात्रता

देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटी संस्थेत इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन किंवा कॉम्युटर सायन्स विभागांतर्गत व्हीएलएसआय डिझाईन किंवा चिप डिझाईनमध्ये बी.टेक आणि एम.टेक अभ्यासक्रमाची आवश्यकता आहे.

आकर्षक वेतन

चिप डिझायनिंग क्षेत्रात फ्रेशर बी.टेक इंजिनिअरला प्रारंभी चार ते पाच लाखांपर्यंतचे पॅकेज सहजपणे मिळू शकते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT