Latest

लोकजनशक्ती पार्टीसह रालोआ बैठकीस ३८ पक्ष हजर राहणार; भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची माहिती

backup backup
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या मंगळवारी (दि. १८) होणाऱ्या बैठकीस 38 पक्ष हजर राहणार असल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही वर्षात रालोआची व्याप्ती देशव्यापी झाली असल्याचेही नड्डा यांनी यावेळी नमूद केले. दरम्यान लोकजनशक्ती पार्टी रालोआत सामील झाली आहे.
केंद्रातील मोदी सरकारची धोरणे योजनांमुळे रालोआमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे सांगून नड्डा पुढे म्हणाले की, देशाच्या कानाकोपऱ्यातील रालोआच्या राजकारणात सामील झाले आहेत. रालोआ ही देशाला मजबूत करणारी आघाडी आहे तर दुसरीकडे संपुआकडे नेता आणि निर्णय घेण्याची क्षमता नाही. बंगळुरूमध्ये संपुआचे घटक पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी व छायाचित्रे काढून घेण्यासाठी जमले आहेत.

 लोकजनशक्ती पार्टीचा रालोआत प्रवेश

चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टीने अधिकृतपणे रालोआत प्रवेश केला आहे. लोकसभेच्या सहा जागा देण्यासह अन्य काही मागण्यांसाठी पासवान अडून बसले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच नड्डा यांच्यासोबत त्यांनी या मागण्यांवर चर्चा केली. अखेर पासवान यांची समजूत काढण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले. रालोआच्या बैठकीस पासवान हजर राहणार असल्याची माहिती नड्डा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
हेही वाचा
SCROLL FOR NEXT