Bangladesh : बुरीगंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट बुडाली; चौघांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेश मधील ढाकाजवळील बुरीगंगा नदीत केरनीगंजच्या तेलघाट क्षेत्राजवळ बोट उलटल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. बोट ढाक्याच्या सदरघाटावरून तेलघाटाच्या दिशेने निघाली होती. वाळूने भरलेल्या बल्कहेडला बोट धडकली. रविवारी (दि.१६) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. अपघाताची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या तीन तुकड्या आणि तटरक्षक दलाचे एक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले. बचावकार्य अजूनही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Bangladesh)
माहितीनुसार, ढाक्याच्या सदरघाटावरून तेलघाटाच्या दिशेने चाललेल्या बोटेची वाळूने भरलेल्या बल्कहेडशी धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की चारजणांचा मृत्यू झाला तर, अनेकजण जखमी झाले आहेत. रॉयटर्स या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, बोटीमध्ये २० जणांचा समावेश होता. अग्निशमन सेवेच्या अधिकार्यांचाच्या माहितीनुसार आठ जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. वाचवण्यात आलेल्यांमध्ये चार पुरुष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. तथापि, जहाजावरील अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत.
हेही वाचा
- Maharashtra Assembly Session | विधानभवनात दोन पवार गट, नेमके कोणाकडे किती आमदार?
- NDA Meeting : रालोआ घटक पक्षांच्या उद्याच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष; महाराष्ट्रातून शिंदे, अजित पवार गट उपस्थित राहणार
- Maharashtra Monsoon Session : शेतकरीप्रश्नी विरोधक आक्रमक, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
- चांद्रयान मोहिमेला जळगावच्या सुपुत्राचे इंधनरूपी बळ, संजय देसर्डा यांची द्रवरूप इंधननिर्मितीत प्रमुख भूमिका
- Kolhapur News | बाळूमामांच्या अमावस्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी, ३ किमीपर्यंत भाविकांची रांग, वाहतूक ठप्प

