Latest

मोदी सरकारकडून डिजिटल स्ट्राईक सुरुच ! २२ युट्यूब चॅनेल्ससह एका न्यूज वेबसाईटवर बंदी

निलेश पोतदार

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाने आपत्कालीन अधिकारांचा वापर करीत २२ युट्यूब चॅनेल्स, ३ ट्विटर खाती, १ फेसबूक खाते तसेच न्यूज वेबसाईटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ब्लॉक करण्यात आलेल्या २२ युट्यूब चॅनेल्सची एकूण व्हुअरशिप २६० कोटी इतकी होती.

कारवाई करण्‍यात आलेल्‍या सोशल मीडिया खाती आणि युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून देशाची सुरक्षा, परराष्ट्र धोरण तसेच देशहिताविरोधात खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात असल्याचे केंद्र सरकारने स्‍पष्‍ट केले आहे. आयटी रुल्स 2021 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे भारतीय युट्यूब चॅनेल्सवर झालेली ही पहिलीच कारवाई आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्‍ये  आयटी रुल्स 2021 चा अध्यादेश जारी केला होता. लेटेस्ट ब्लॉकिंग ऑर्डरनुसार १८ भारतीय आणि चार पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. फेक अर्थात खोट्या बातम्या पसरविण्यासाठी या चॅनेल्सचा वापर केला जात होता. विशेषतः भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर राज्याशी संबंधित मुद्यांवर खोटी माहिती पसरवली जात होती. वेगवेगळ्या सोशल मीडिया खात्यांच्या माध्यमातून पोेस्ट करण्यात आलेल्या भारतविरोधी कंटेटलाही ब्लॉक करण्यात आले आहे. भारतीय युट्यूब चॅनेल्सच्या माध्यमातून युक्रेनमधील स्थितीवर चुकीची माहिती देण्यात येत असल्याचे देखील आढळून आले आहे. इतर देशांशी भारताचे संबंध खराब व्हावेत, असा या चॅनेल्स चालविणार्‍यांचा व त्यांच्या पाठिराख्यांचा उद्देश असल्याचे सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

ब्लॉक करण्यात आलेल्या युट्यूब चॅनेल्समध्ये काही दूरचित्रवाहिन्यांच्या लोगो आणि टेम्पलेटचा वापर करण्यात आला होतायुट्यूब चॅनेल पाहणार्‍यांची दिशाभूल करण्यासाठी असे करण्यात आले होते. पाकिस्तानी चॅनेल्सच्या माध्यमातून भारतविरोधी प्रचार केला जात होता. गतवर्षीच्या डिसेंबर महिन्यात देखील सरकारने 78 युट्यूब चॅनेल्सवर बंदी घातली होती.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT