कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांचा ‘आप’ मध्ये प्रवेश | पुढारी

कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांचा 'आप' मध्ये प्रवेश

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभेची निवडणूक २०२३ मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी आज (बुधवार) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आप पक्षात प्रवेश केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भास्कर राव यांना पक्षाचे सदस्यत्व दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, दिल्लीतील आप सरकारची प्रतिमा देशभरात विखरू लागली आहे. त्याचाच परिणाम पंजाबमध्ये दिसून आला. पंजाबच्या निकालामध्ये जनतेनं अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला आपला कौल दिला होता. आता त्याची लाट दक्षिणेतही पाहायला मिळत आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी भास्कर राव यांनी नोकरी सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. भास्कर राव हे बंगळुरूचे पोलीस आयुक्त होते. जे काम नेत्यांना करायचं होतं, ते समाजहिताचं काम राव यांनी स्वत: केले आहे, असे सिसोदिया यांनी सांगितलं.

माजी आयपीएस अधिकारी भास्कर राव म्हणाले, मी २५ वर्षे पोलीस दलात नोकरी केली आहे. शिवाय, सैन्यातही कामगिरी बजावली आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा संघर्ष आणि जीवन पाहून मी प्रभावित झालो. कर्नाटकातील सामान्य माणसालाही बदल हवा आहे. पारंपरिक पक्ष आपण खूप बघितले आहेत. पक्ष गेले, पण व्यवस्था बदलली नाही. म्हणून, मी आम आदमी पक्षात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button