देशात लोकशाहीचे नाही तर दबावाचे राजकारण सुरू : आदित्य ठाकरे | पुढारी

देशात लोकशाहीचे नाही तर दबावाचे राजकारण सुरू : आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात लोकशाहीचे नाही तर दबावाचे राजकारण सुरू आहे. भाजपचे लोक आता उघडउघड धमक्या देत आहेत. आमच्या नेत्यांवर राजकीय हेतूने ईडीची कारवाई केली जात आहे, असा आरोप पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. ते पुण्यातील लोहगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

दरम्यान, आज शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीकडून मोठा दणका बसला. ईडीने राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांचे अलिबागमधील ८ भूखंड, दादरमधील १ फ्लॅट जप्त केले. या वृत्तानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन अडीच वर्षात ज्याप्रकारे भाजप सर्व पक्षांना वागणूक देत असल्याचे पाहिले आहे. वाढती महागाई, बेरोजगारी लपवण्यासाठी यंत्रणा तसेच हे विषय समोर आणले जात आहेत का हाही प्रश्न आहे. हे राजकारणापेक्षा मोठे विषय असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कामे, विकास करत राहणे गरजेचे आहे. हे सुडाचे राजकारण राजकारण थांबले पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

Back to top button