संग्रहित फोटो  
Latest

Kumbh Mela Nashik : सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंत्रालयात नियोजन, आज बैठक

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या आठवड्यात नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक महापालिकेत बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला होता. त्यादृष्टीने आढावा घेतलेले विषय तातडीने मार्गी लागावेत. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन (Kumbh Mela Nashik) करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.7) मुंबईत बैठक बोलावली आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाला शह देण्यासाठी तसेच शिंदे गटाची नाशिकमध्ये ताकद वाढीस लागावी यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नाशिकमध्ये शिवसेनेचे आमदार दादा भुसे यांना पालकमंत्रिपदी विराजमान केले आहे. पालकमंत्रिपदी निवड झाल्यानंतर लगेचच भुसे यांनी नाशिक महापालिकेत आढावा बैठक घेत अनेक प्रश्न हाताळले. त्यातील महत्त्वाच्या विषयात 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela Nashik), मनपातील नोकरभरती, क्लस्टर डेव्हलपमेंट, वाढ झालेली घरपट्टी कमी करणे या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. शिंदे गटाने शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांना गळाला लावत शिवसेनाप्रणीत म्युनिसिपल कर्मचारी संघटनादेखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. असे झाल्यास ठाकरे गटाच्या हातून मोठी संघटना जाण्याची भीती आहे. मनपातील महत्त्वाच्या विषयांबाबत मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

मंत्रालयात होणार्‍या बैठकीत विविध विषयांसंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली. या बैठकीबाबत अद्याप मनपाकडे विषयपत्रिका आलेली नसली तरी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महत्त्वाची कामे, 60 मीटरचा बाह्य रिंग रोड आणि मनपातील रिक्तपदे भरणे अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी सिंहस्थाच्या अनुषंगाने मनपाला लागणार्‍या अतिरिक्त मनुष्यबळाचा विचार करताना किमान मनपा निवडणुकीनंतर नोकरभरतीचा बिगुल महापालिकेत वाजू शकतो.

शदे गटाची धावपळ

नाशिक महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपसह शिंदे गटाकडून धावपळ सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवरच पालकमंत्री दादा भुसे यांनीही नुकतीच मनपा मुख्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT