पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात खासगी दुकानदारांनी लावलेली चप्पल स्टॅन्ड काढण्याच्या कारणावरून वाद सुरू आहे. अंबाबाई मंदिराच्या मूळ भिंतीला लागून असलेली चप्पल स्टॅन्ड काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून आज कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिका कर्मचारी आणि खासगी दुकानदार यांच्यात वाद झाला. यामुळे मंदिर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला.
संबंधित बातम्या :
अंबाबाई मंदिराची मुळ भिंत दिसावी यासाठी मंदिराच्या भिंतीला लागून असलेली चप्पल स्टॅन्ड काढण्याची मागणी भाविकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आज मंदिराच्या भिंतीला लागून असलेली चप्पल स्टॅन्ड काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने खासगी चप्पल स्टॅन्ड लावलेल्यांवर कारवाई करत स्टँड जप्त केली. यावेळी चप्पल स्टॅन्डधारक आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. दरम्यान, स्टॅन्ड धारकांनी अतिक्रमण पथकाविरोधात आक्रोश केला. महापालिकेने कोणतीही पूर्व नोटीस न देता कारवाई केली असल्याचा आरोप स्टॅन्ड धारकांनी केला आहे.
हेही वाचा :