Latest

Kolhapur Bandh : औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना रोखा : संभाजीराजे

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : "शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे," अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

कोल्हापुरमध्ये मंगळवारी शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने कोल्हापूर शहरात आज संतप्त पडसाद उमटले. या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती. शहरात दुपारपर्यंत प्रचंड तणाव होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले होते. पोलिसांनी येथे धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दरम्यान, सरकारने दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटद्वारे केली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT