kk songs playlist 
Latest

KK last show : शेवटच्‍या शाेमध्‍ये केके यांनी गायली १८ गाणी, जमिनीवर पडून राहिली प्लेलिस्ट

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

के के (KK last show) यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्वी या प्रसिद्ध गायकाने मंचावर जोरदार परफॉर्मन्स दिला. या कॉन्सर्टचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता एका प्लेलिस्टचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही प्लेलिस्ट त्याच स्टेजवर पडली आहे ज्यावर KK (KK last show) यांनी शेवटचा परफॉर्मन्स दिला होता. यामध्ये एकूण १८ गाणी आहेत. जे बहुधा के.के. यांनी स्वतःच्या हातांनी लिहिले आहे. अशाप्रकारे प्लेलिस्टचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दुसरीकडे, केके यांच्या निधनाबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, नझरूल मंच येथे एका महाविद्यालयाने  कार्यक्रमाचे आयोजन केले होते, तेथे कार्यक्रम केल्यानंतर केके त्यांच्या हॉटेलमध्ये परतले तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते. गायकाला खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

केकेने त्यांच्या करिअरमध्ये २०० हून अधिक गाणी गायली आहेत. केकेने हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. केकेने तुम मिली, बचना ए हसीनो, ओम शांती ओम, जन्नत, वो लम्हे, गुंडे, भूल भुलैया, हम दिल दे चुके सनम यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या आवाजाची जादू पसरवली.

दरम्यान, कोलकातामधील रवींद्र सदन येथील सदन येथे के के यांच्या पार्थिवाला पश्चिम बंगाल सरकारतर्फे बंदुकीची सलामी देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या. के के यांच्या पार्थिवावर उद्या मुंबईमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT