पुढारी ऑनलाईन डेस्क
कॅटरीना कैफ आणि विकी कौशल यांनी आपल्या घरातील फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर कॅटरीन कैफने इन्स्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला होता. कॅटरीना कैफ आणि विकीचं लग्न बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत होतं. हे कपल रविवारी जुहू येथील त्यांच्या नवीन घरात रहायला गेले आहेत. त्यांनी घराचा एक फोटोही शेअर केला आहे.
दोघांनी वैवाहिक आयुष्याला सुरुवात केलीय. सवाई माधोपूर येथे दोघांचं शाही लग्न ९ डिसेंबर रोजी पार पडलं. त्यावेळी दोघेही विराट-अनुष्काच्या घराशेजारी राहायला जाणार असल्याचे वृत्त समोर आले होते. आता दोघांनीही नव्या घरात प्रवेश केलाय. त्यांच्या घराचे फोटोही व्हायरल झाले आहेत.
अलिकडेच कॅटरीनाने घरात प्रवेश केल्यानंतर शिरा बनवला होता. तिने इन्स्टा स्टोरीवर शिऱ्याचा फोटो शेअर केला होता.
गृहप्रवेशावेळी विधीवत पूजा केली. यावेळी त्यांच्या कुटुंबीय उपस्थित होते. रविवारी सकाळी विकीचे वडील शाम कौशल, आई वीणा हे विकीच्या इमारतीत जाताना दिसले होते.
कॅटरीना आणि विकी जुहू येथील राजमहल इमारतीत राहायला गेले आहेत. हे घर त्यांनी पाच वर्षांसाठी भाड्याने घेतल्याचे समजते. त्यांच्याच शेजारी क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील आहेत. अनुष्काने विकॅटला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. आणि ते आपले शेजारी होणार असल्याचे सांगितले होते.
जुहू येथील राजमहल बिल्डिंगमधील आठव्या मजल्यावर विकॅटचं फ्लॅट आहे. त्यांनी तो पाच वर्षांसाठी भाड्याने घेतला आहे. या फ्लॅटसाठी प्रारंभी तीन वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला ८ लाख रुपये भाडे देणार आहेत. तर डिपॉझिट म्हणून १.७५ कोटी रुपये भरले आहेत. अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार कळते. विकॅट यांचं घर ५ हजार स्केअर फूट असल्याचे वृत्त आहे.