‘जुम्मे की रात’ गाण्यावर सलमान खानसोबत शिल्पाचे ठुमके (Video) | पुढारी

‘जुम्मे की रात’ गाण्यावर सलमान खानसोबत शिल्पाचे ठुमके (Video)

पुढारी ऑनलाईन

भाईजान सलमान खाने लाखो चाहते आहेत . तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो. नुकतेच सलमानने एका राजकीय नेत्याच्या मुलाच्या लग्नात हजेरी लावली. यावेळी तो व अभिनेत्री शिल्पा शेट्टी नाचतानाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दोघेजण बर्‍याच वेळ थिरकताना पाहायला मिळत आहेत. तसेच, अनिल कपूरही या लग्नात नाचताना दिसत आहे. सलमान खानच्या ‘जुम्मे की रात’ या गाण्यावर नाचत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनिल कपूरही डान्स करत असताना सलमान खानला चीअर करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

मात्र, सलमान खाननं शिल्पा शेट्टीसोबत डान्स करहत असताना सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले.

video-beingshahbaaz.ig insta वरून साभार

Back to top button