Karl Marx & Rahul Gandhi  
Latest

Karl Marx & Rahul Gandhi : राहुल गांधींच्या ‘त्या’ व्हायरल फोटोची चर्चा; जाणून घ्‍या त्या मागील सत्य?

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉंग्रेस पक्षाची (Congress) बहुचर्चित असलेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. केरळमधून सुरु झालेल्या या यात्रेने हजाराे किलोमीटर चालले असावेत. या यात्रेचे नेतृत्त्‍व कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी करत आहेत. (Rahul Gandhi) या यात्रेदरम्यान राहुल गांधी खूपवेळा चर्चेत आलेले तुम्ही पाहलं असेल. कधी त्यांच्या टी-शर्टची किंमत, कधी त्यांचे शूज तर कधी पावसातील भाषण. त्यांचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता ते पुन्हा एकदा चर्चेत (Karl Marx & Rahul Gandhi ) आले आहेत. त्याच कारण आहे त्यांची वाढलेली दाढी. हजारो किलोमीटर करत असलेल्या राहुल गांधी यांच्या लुकमध्ये बराच बदल झाला आहे. जाणून घेवूया राहुल गांधींच्या व्हायरल हाेणार्‍या फोटोमागील सत्‍य काय आहे याविषयी…

राहुल गांधी यांची तुलना कार्ल मार्क्सशी!

राहुल गांधी यांचा दाढी वाढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. काही लोक त्यांच्या दाढी वाढलेला फोटोची अनेक लोकांशी तुलना करत असताना पाहायला मिळत आहे. मिम्स व्हायरल होताना दिसत आहेत. त्यातील सध्या चर्चेत असलेला एक फोटो म्हणजे राहुल गांधी आणि कार्ल मार्क्स यांचा. राहुल गांधी यांचा दाढी वाढलेला फोटो आणि विचारवंत कार्ल मार्क्स (Karl Marx) यांचा फोटो व्हायरल होताना दिसत आहे. यावर सोशल मिडिया युझरही कॉमेंट करत आहेत.

Karl Marx & Rahul Gandhi :"या फोटोसाठी फुल मार्क्स"

राहुल गांधी आणि कार्ल मार्क्स यांचा तुलना केलेला फोटोवर सोशल मीडिया युझर वेगवेगळ्या पद्धतीने रियॅक्ट होताना दिसत आहेत. एक युझर म्हणत आहे, "दोघेही एकसारखे वाटत आहेत". तर एकजण म्हणत आहे "राहुल गांधी कार्ल मार्क्स बनण्याच्या वाटेवर " तर एकजण म्हणत आहे, "या फोटोसोठी फुल्ल मार्क्स". तर एकाने म्हटलं आहे "कार्ल मार्क्स आले राहुल गांधीच्या मदतीला" अशा एका पेक्षा एक भन्नाट  कॉमेंट येत आहेत.

Karl Marx & Rahul Gandhi : फोटोमागील सत्य

राहुल गांधी यांचा दाढी वाढलेला जो फोटो आहे ज्याची तुलना कार्ल मार्क्सशी केली जात आहे. तो फोटो एडिट केला गेला आहे. राहुल गांधी यांची दाढी आणि डोक्यावरील केस फोटो शॉपने एडिट केले आहेत. यातील फोटोला आणखी पुष्टी द्यायची म्हटलं तर कॉंग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे फोटो. यावरुन स्पष्ट होतयं राहुल गांधी यांचा व्हायरल होत असलेला फोटो एडिट केला गेला आहे.

कोण  हाेते कार्ल मार्क्स ( १८१८-१८८३)

१९ व्या शतकातील जर्मनीमधील थाेर विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून कार्ल मार्क्स यांच्याकडे पाहिलं जाते. त्यांचा जन्म पश्चिम जर्मनीतील र्‍हाइनलँड प्रांतातील ट्रीर शहरात ५ मे १८१८ रोजी झाला.  कार्ल मार्क्‍स यांनी त्याचे साम्यवादी तत्त्वज्ञान "दास कॅपिटल' या ग्रंथातून मांडले.त्यांच "धर्म ही अफुची गोळी आहे" हे वाक्य जगप्रसिद्ध आहे.

जर्मन विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ कार्ल मार्क्स.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT