काँग्रेसने देशात बेरोजगारी निर्माण केली नाही; राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना सडेतोड उत्तर | पुढारी

काँग्रेसने देशात बेरोजगारी निर्माण केली नाही; राहुल गांधी यांचे पंतप्रधान मोदींना सडेतोड उत्तर

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था काँग्रेसने 70 वर्षांत देशाला कधीही सर्वाधिक बेरोजगारी दिली नाही. आम्ही विक्रमी महागाई दिली नाही, असे प्रत्युत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटद्वारे दिले आहे. काँग्रेसने 70 वर्षांत देशासाठी काय केले, असा प्रश्न पंतप्रधान मोदींकडून सातत्याने विचारला जातो. या प्रश्नाला राहुल गांधी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. भाजप सरकार शेतकरी, तरुण आणि महिलांच्या विरोधात आहे. देश पाच ते सहा श्रीमंत उद्योगपतींच्या हाती आहे. हे लोक देशातील हव्या त्या व्यवसायात आपली मक्तेदारी प्रस्थापित करत आहेत.

भाजपकडून देशातील महागाई आणि बेरोजगारीचा फायदा उद्योगपतींना करून देत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. या यात्रेत काँग्रेस नेत्यांकडून सत्ताधारी भाजपचे धोरण आणि कार्यशैलीवर वारंवार टीका करण्यात येत आहेत. राहुल गांधींनीही पंतप्रधान मोदींवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

Back to top button