पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या काँग्रेस अध्यक्षांवर गांधी परिवाराचा कोणताही रिमोट कंट्रोल असणार नाही. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर मैदानात उतरले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेले दोन्ही उमेदवार परिपक्व आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गांधी परिवाराचे कोणतेही नियंत्रण असणार नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत. ते भारत जोडो यात्रेत बोलत होते. (New Congress President)
राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले, भारत जोडो यात्रेत मी एकटाच नाही, तर बेरोजगारी आणि महागाईने त्रस्त असलेले लाखो लोक आमच्यासोबत आहेत. एका मोठ्या वर्गाचे मत आहे की, नव्या काँग्रेस अध्यक्षांवर गांधी परिवाराचा रिमोट कंट्रोल असेल. याबाबत राहुल गांधी यांनी स्पष्ट मते मांडली आहेत. ते म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असलेल्या दोन्ही उमेदवारांकडे चांगला दृष्टीकोण आहे आणि ते नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. अशा चर्चा उमेदवारांना अपमानीत करण्यासाठी केल्या जात आहेत. (New Congress President)
पुढे राहुल गांधी बोलताना म्हणाले की, द्वेष आणि हिंसा करणे हे राष्ट्रविरोधी कार्य आहे. आम्ही अशा लोकांविरोधात लढत आहोत. तसेच आम्ही नव्या शैक्षणिक धोरणाचा विरोध करत आहोत. कारण नवे शैक्षणिक धोरण इतिहास आणि परंपरांना विकृत करत आहे. (New Congress President)