Bharat Jodo Yatra : शरद पवारांप्रमाणे राहुल गांधींनीही गाजवल मैदान; म्हैसूरमध्ये भरपावसात घेतली सभा | पुढारी

Bharat Jodo Yatra : शरद पवारांप्रमाणे राहुल गांधींनीही गाजवल मैदान; म्हैसूरमध्ये भरपावसात घेतली सभा

म्हैसूर ः वृत्तसंस्था काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नुकतीच तामिळनाडू, केरळमधील प्रवास पूर्ण करून कर्नाटक राज्यात पोहोचली असून रविवारी राहुल यांनी म्हैसूरमध्ये उपस्थित समुदायाला भर पावसात संबोधित केले. बेरोजगारी आणि रोजगाराचा मुद्दा काँग्रेस मांडतच राहणार आहे. आपल्याला भारत जोडायचा आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. (Bharat Jodo Yatra)

जोरदार पावसात झालेल्या सभेला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. राहुल गांधींनीही हा व्हिडीओ ट्विट केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याच प्रकारे भर पावसात सातार्‍यात सभेला संबोधित केले होते. त्या आठवणी राहुल गांधी यांच्या आजच्या सभेमुळे ताज्या झाल्या. (Bharat Jodo Yatra)

हेही वाचलंत का?

Back to top button