karrena kapoor वादाच्या भोवऱ्यात 
Latest

Kareena Kapoor ने धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

backup backup

मुंबई; पुढारी ऑनलाईन: बॉलीवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी Kareena Kapoor सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी Kareena Kapoor विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नुकतेच करीना कपूर हिने प्रेग्नेंसी संदर्भात एका पुस्तकाची घोषणा केली. या पुस्तकाचे नाव 'Pregnancy Bible' असे आहे. या पुस्तकाच्या नावावरुन वाद निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे यांनी करीना कपूरविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अधिक वाचा : 

बायबलचा उल्लेख केल्याने भावना दुखावल्या

करिनाच्या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये 'बायबल' या पवित्र शब्दाचा उल्लेख आहे. ज्यामुळे ख्रिश्चन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिंदे यांनी आयपीसीच्या कलम २९५- अ अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी तक्रार आल्याची माहिती दिली, पण तक्रार दाखल केलेला नाही, असे त्यांनी सांगितले.

शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक साईनाथ थोंबरे यांनी पीटीआयला यासंदर्भात माहिती दिली."आम्हाला तक्रार मिळाली आहे परंतु येथे (बीडमध्ये) अशी घटना घडली नसल्यामुळे येथे कोणताही गुन्हा दाखल होऊ शकला नाही.

अधिक वाचा : 

मी त्यांना मुंबईत तक्रार देण्याचा सल्ला दिला आहे." असे थोंबरे यांनी सांगितले.करीनाचे नुकतीच तिच्या 'करीना कपूर खानस् प्रेग्नेंसी बायबल' ची घोषणा केली होती.

करीना कपूरने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या पुस्तकात दोन्ही वेळेसच्या प्रेग्नेन्सीदरम्यानचे अनुभव लिहिले आहेत.

अधिक वाचा : 

आई होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी तिने हा अनुभव शेअर केल्याचं तिने म्‍टहलं हाेते.

हे पुस्तक माझ्यासाठी तिसऱ्या मुलाप्रमाणेच असल्याचेदेखील तसेच करीनाने म्हटले होते.

हे ही वाचा : 

हे ही पाहा : 

[visual_portfolio id="3941"]

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT