आमिर खान याच्या 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटातून अभिनेता नागार्जुन अक्किनेनीचा मुलगा चैतन्य बॉलीवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटाचे शूटिंग कारगिलमध्ये सुरू झाले आहे.
हा चित्रपट हॉलीवूडचा दिग्गज टॉम हॅन्क्सचा 1994 मधील 'फॉरेस्ट गंप' या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात करिना कपूर खान, तमिळ स्टार विजय सेठूपती आणि मोना सिंग यांनीही भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटाची पटकथा अभिनेता लेखक अतुल कुलकर्णी यांनी लिहिली असून, दिग्दर्शन अद्वैत चंदन यांचे आहे. हा चित्रपट येत्या ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो चैतन्याने शेअर केले आहेत. त्यामध्ये आमिर खानआणि किरण राव या दोघांनी नुकताच घटस्फोट घेतला आहे. मात्र, त्याचा परिणाम त्यांच्या कामात कुठेही दिसत नाही. दोघेही एकदम परफेक्ट प्रोफेशनॅलिस्ट दिसत आहेत.