पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये असून, ती कुटुंबासोबत सुट्यांचा आनंद घेत आहे. तिने पती सैफ अली खान, मुले तैमूर आणि जेह यांच्यासोबतचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील खास बाब म्हणजे, या फोटोत करिना कपूरचे बेबी बंप दिसत आहे. यामुळे चाहत्यांनी करिना तिसऱ्यांदा प्रेंग्नट (Kareena Kapoor Khan Pregnant) असल्याचा कयास लावला जात आहे.
नुकतेच करिना कपूर आपल्या जवळच्या मित्रमैत्रीनींसोबत लंडनमध्ये सुट्याचा आनंद घेत आहेत. यावेळी तिच्यासोबत बहिण करिश्मा कपूर आणि बेस्ट फ्रेंड अमृता अरोराही दिसत आहे. या व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यावेळी करिनाने ब्लॅक रंगाचा टँक टॉप परिधान केली होता. याशिवाय एका फोटोत सैफ आणि करिनासोबत तिचा लंडनमधील एक फ्रेंडदेखील दिसत आहे.
हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड कलाकरांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका युजर्सने 'करिना तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे काय?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. दुसऱ्या एका युजर्सने 'तिसऱ्यांदा आई होणार म्हणून करिना इतकी आनंदी आहे का?' असे म्हटले आहे. याशिवाय आणखी काही नेटकऱ्यांनी 'छान', 'सुंदर', 'अप्रतिम' या कॉमेंन्टसोबत हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. (Kareena Kapoor Khan Pregnant)
या फोटोत काही ठिकाणी करिना फ्रेंडच्या पाठीमागे उभी असल्याचे दिसतेय. तर काही ठिकाणी तिने ढिले कपडे परिधान केले आहेत. यामुळे चाहत्यांनी करिना तिसऱ्यांदा आई होणार असल्याचा कयास लावला आहे; परंतु करिना कपूर किंवा तिच्या नातेवाईकांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
करीना कपूरने २०१२ मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केले होतं. यानंतर करिनाला २०१६ तैमूर आणि २०२१ मध्ये जेह अशी दोन मुले आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना लवकरच आमीर खानसोबत 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटात दिसणार आहे. हा हॉलिवूड चित्रपट 'फॉरेस्ट गंप' चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे.
हेही वाचलंत का?