Katrina Kaif B’day : हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कॅटनं बॉलिवूडमध्ये कसं बस्तान बसवलं? | पुढारी

Katrina Kaif B'day : हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या कॅटनं बॉलिवूडमध्ये कसं बस्तान बसवलं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅटरिना कैफला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. चित्रपटसृष्टीत तिने एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. अभिनय, नृत्यासोबतच तिच्या सौंदर्याचाही बोलबाला आहे. चाहते अभिनेत्रीच्या एका झलकची आतुरतेने वाट पाहत आहेत. आज (१६ जुलै) ती तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवशी, तिचे चाहते तसेच मोठे स्टार्स त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तुम्हाला माहितीये का? कॅटचा जन्म हाँगकाँगमध्ये झालाय. पण, पुढे तिने कशाप्रकारे बॉलिवूडमध्ये आपले बस्तान बसवले, जाणून घ्या.

कॅटरिना कैफचा जन्म १६ जुलै, १९८३ रोजी हाँगकाँगमध्ये झाला. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी ती तिच्या कुटुंबासह हवाई (यूएस) येथे राहायला गेली आणि त्यानंतर ती लंडनला शिफ्ट झाली. कॅटरिना कैफचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी होते. तिची आई सुझान टॉर्केट्टी ही मूळची ब्रिटिश आहे. कॅट लहान असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. यानंतर तिचा सांभाळ आईने केला.

वास्तविक, कॅटने वयाच्या १४ व्या वर्षी हवाई येथील सौंदर्य स्पर्धा जिंकली होती. यानंतर, तिला दागिन्यांच्या मोहिमेसाठी तिचे पहिले मॉडेलिंग असाईनमेंट मिळाले. यानंतर तिने लंडन फॅशन वीकसाठी रॅम्प वॉक केला. यादरम्यान ती तिच्या मैत्रिणीसोबत भारतात आली आणि त्यानंतर एका फॅशन शोदरम्यान दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांची कॅतरिनावर नजर पडली. त्यानंतर त्यांनी कॅटला चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर दिली.

कॅटने बॉलीवूड एंट्रीनेही चित्रपटांमध्ये काम करण्यास होकार दिला आणि फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले. दिग्दर्शकाने तिला ‘बूम’ चित्रपटाची ऑफर दिली, ज्यामध्ये कॅने जबरदस्त बोल्ड सीन्स दिले. पण तिला ओळख मिळाली नाही. हा चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला होता. यानंतर कॅट सलमान खानच्या ‘मैने प्यार क्यूं किया’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटाने कॅटचे नशीब फिरले.

कॅटचा अभिनय लोकांना तर खूप आवडलाच. सलमानसोबतची तिची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. ‘मैने प्यार क्यूं किया’ नंतर कॅटच्या नशिबाने कलाटणी घेतली. या चित्रपटानंतर कॅटला एकापेक्षा एक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या.

फिर हमको दीवाना कर गये, नमस्ते लंडन, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, ठग्स ऑफ हिंदोस्तान यासह अनेक चित्रपटांमध्ये कॅट दिसली. त्याचबरोबर ती लवकरच ‘टायगर-३’ आणि ‘फोन बूथ’मध्ये दिसणार आहे.

हेदेखील वाचा-

Back to top button