Medha Patkar : सोशल फंडचा गैरवापर केल्याप्रकरणी मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल | पुढारी

Medha Patkar : सोशल फंडचा गैरवापर केल्याप्रकरणी मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन :  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांच्यावर मध्य प्रदेशातील एका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. मेधा पाटकर यांच्यावर स्वयंसेवी संस्थेच्या नावाखाली पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील बरवानी कोतवाली पोलीस स्टेशमनमध्ये याप्रकरणी मेधा पाटकर यांच्यासह ११ जणांविरूद्ध एफआयआर नोंद करण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील बरवानी जिल्ह्यातील टेमला येथील रहिवाशी प्रीतम बडोले यांनी मेधा पाटकर यांच्यावीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मुंबईतील नोंदणीकृत नर्मदा नवनिर्माण अभियान ट्रस्टने मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील नर्मदा खोऱ्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शैक्षणिक सुविधा चालविण्यासाठी जमा केलेल्या पैशाचा नियमानुसार गैरव्यवहार केल्याचा आरोप बडोले यांनी केला आहे.

याप्रकरणी मेधा पाटकर यांच्याशी संवाद साधला असता, आमच्याकडे प्रकल्पासंबंधित सर्व कागदपत्रे आणि पुरावे असून, आमच्यावर केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. आम्ही पैशाचा वापर लोकांना उपजीविका निर्माण करण्यासाठी केला आहे आणि यापुढेदेखील करत राहू, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

 

Back to top button