बेळगाव : अलमट्टीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

बेळगाव : अलमट्टीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे अलमट्टी धरणातून आज (शनिवार) सकाळी दहा वाजल्यापासून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गेले तीन दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग सव्वा लाख क्युसेक सुरू ठेवण्यात आला होता.

या धरणाची क्षमता 123 टीएमसी असून, सध्या या धरणांमध्ये 87.992 टीएमसी म्हणजे 71 टक्के पाणीसाठा आहे. सध्या या धरणांमध्ये एक लाख 29 हजार 872 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पाणी विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे धरणाच्या पायथ्‍याच्या भागातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा :  

Back to top button