जयंत पाटील 
Latest

#Jayant Patil म्हणाले, नारपार प्रकल्प अंतिम टप्यात

अनुराधा कोरवी

पश्चिम वाहिनी नद्यांमधून गुजरातला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी महत्वांकाक्षी असलेला नारपार, दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प अंतिम टप्यात आहे ( #Jayant Patil ). डिसेंबरमध्ये या प्रकल्पांच्या (नारपार प्रकल्प) अहवालांना मुर्तस्वरूप प्राप्त होईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

कोणत्याही परिस्थितीत राज्याच्या हक्काचे पाणी गुजरातला देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रवाही वळण योजनांच्या कामांना गती देत सिंचनाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचना पाटील (Jayant Patil) यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.२) पाटील यांनी जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, ॲड. माणिक कोकाटे, हिरामण खोसकर, नितीन पवार, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे,

गोदावरी मराठवाडा विकास महामंडळ औरंगाबादचे कार्यकारी संचालक कि.भा. कुलकर्णी, नाशिकचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, प्रमोद मांदाडे, मेरीचे महासंचालक आर. आर. शहा, अधिक्षक अभियंता अलका अहिरराव आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील आहे. राज्याच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पातून २६४ दलघफू पाणी नाशिक व मराठवाड्याला ऊपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

नांदुरमधमेश्वर प्रकल्प येथील पक्षी अभयारण्याच्या अनुषंगाने बीओटी (बांधा, वापरा व हस्तांरीत करा) या तत्वावर पर्यटन केंद्र विकसीत करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पर्यटन विभागाची मदत घेतली जाईल. धरणातील गाळ काढण्यासाठी लवकरच योजना राबविण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

वैतरणाचे पाणी वळविणार

इगतपूरीमधील अपर वैतरणातून ११ टीएमसी पाणी मुकणेत वळविण्यात येणार आहे. त्यासाठी दोन्ही धरणांच्या मधोमध बांध घालून पाणी वळविले जाईल, अशी माहिती जयंत पाटील ( #Jayant Patil )यांनी दिली.

सिंचनाच्या प्रभावी उपाय योजनेसाठी पालखेड कालवा नुतनीकरणाच्या कामासाठी ३८ कोटी तसेच गोदावरी उजवा व डावा कालव्यांच्या बांधकामाला १०० वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने त्यासाठी ८४ कोटी; व मालेगाव बोरी अंबेदरी, दहीकुटे या लघुपाटबंधारे अंतर्गत बंद पाईपमध्ये रुपांतराच्या कामाला २५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता त्यांनी ( #Jayant Patil )  दिली.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT