नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते इंडिया गेटजवळ सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेच्या होलोग्रामचे अनावरण मोदी यांच्या हस्ते झाले. याबाबत देशभर सर्वत्र चर्चा सुरू आहे. बोस यांचा हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार अद्वैत गडनायक हे बांधणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या या पुतळ्यावरू जावेद अख्तर यांनी ट्विट केले. प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर यांनी पुतळ्याच्या कल्पनेला सार्थ ठरवले असले, तरी पुतळ्याच्या पोझवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
जावेद अख्तर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या या प्रतिमेवर म्हणाले की, नेताजींच्या प्रतिमेची कल्पना चांगली आहे. परंतु, ही पुतळ्यासाठी प्रतिमा योग्य नाही. या पुतळ्याभोवती दिवसभर वाहतूक सुरू राहणार असून, पुतळ्याची पोझ हात जोडून वंदन करणारी असेल तर ती योग्य नाही. त्यांची प्रतिमा बसलेली असावी किंवा हवेत हात फिरवत काहीतरी घोषणा देतानाची असावी.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची प्रतिमा 28 फूट बाय 6 फूट अशी असेल. पाचवा जॉर्ज यांचा पुतळा 1968 मध्ये हटवलेला असून तेथे हा पुतळा उभारण्यात येणार आहे. या दरम्यान, या ट्विटमुळे जावेद अख्तर चर्चेत आले आहेत आणि युजर्सही त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत आहेत.
हे ही वाचलं का