जावेद अख्तर यांच्या वाढदिनी फरहानची मनाला भावणारी पोस्ट व्हायरल | पुढारी

जावेद अख्तर यांच्या वाढदिनी फरहानची मनाला भावणारी पोस्ट व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेता फरहान अख्तरने जावेद अख्तर यांच्या वाढदिनी मनाला स्पर्शून जाणारी एक पोस्ट लिहिली आहे. त्यांचा थ्रोबॅक एक फोटो पोस्ट करत त्याने इन्स्टाग्रामवर एक नोट लिहिलीय. या पोस्टवर फरहानची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकरने प्रतिक्रिया दिली आहे.

गीतकार, संगीतकार अख्तर यांचा आज १७ जानेवारी रोजी ७७ वा वाढदिवस आहे. आजच्या खास दिनी सोशल मीडियावर फरहानने मनाला भावणारी पोस्ट लिहिलीय.

त्‍याने या पोस्टमध्ये  लिहिलंय-अशा रीतीने मी तुम्हाला नेहमी ओळखले आहे.. विचारशील, कधीही आराम न करणारे, जिज्ञासू आणि नेहमी असंख्य गोष्टींचा शोध घेणारे. आशा आहे की तुम्हालाही हे समजले असेल की, तुम्ही किती जणांना असे प्रयत्न करण्यास आणि जगण्यासाठी प्रेरित केले आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पा.. ❤️❤️ @jaduakhtar. (This is how I’ve always known you to be .. thoughtful, restless, curious and always searching for what’s beyond the obvious. Hope you realise how many you’ve inspired to try and live that way. Happy birthday Pa .. ❤️❤️ @jaduakhtar)

फरहानच्या या नोटवरचाहत्यांनी भरभरून कमेंट्स आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. फरहानची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर हिनेदेखील प्रतिक्रिया दिलीय.

अख्तर यांचा जन्म १७ जानेवारी, १९४५ रोजी ग्वालियार, मध्य प्रदेश येथे झाला.

फरहान लवकरच विवाहबंधनात

मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर २१ फेब्रुवारीला लग्न करणार आहेत. मुंबईमध्ये ते विवाह नोंदणी करणार असल्याची माहिती समोर आलीय.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

Back to top button