शोएब अख्तर याला टिव्ही चॅनेलने केले बॅन; काय आहे हे प्रकरण? | पुढारी

शोएब अख्तर याला टिव्ही चॅनेलने केले बॅन; काय आहे हे प्रकरण?

इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानच्या माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर याला मोठा झटका बसला आहे. पहिल्यांदा पाकिस्तानातील सरकारी नियंत्रणातील वाहिनीवर शोएब अख्तर याला अपमानास्पद वागणूक मिळाली आणि नंतर त्या वाहिनीने त्याचे प्रक्षेपण बंद करुन टाकलं. आता या पुढे या वाहिनीवर कोणत्याही कार्यक्रमात शोएब सहभागी होऊ शकणार नाही.

या घटनेनंतर त्या वाहिनीने अधिकृत ट्वीट करुन सांगितले की, शोएब अख्तर आणि वाहिनीचे निवेदक नौमान नियाज यांच्या दरम्यान झालेल्या वादची तपासणी केली जाईल. याचा अहवाल प्राप्त होईपर्यंत दोघांनाही वाहिनीवर सहभागी करुन घेतले जाणार नाही. यानंतर शोएब अख्तर याने प्रतिक्रिया दिली. ट्वीट करत शोएबने लिहले की ही एक चांगली चेष्टा आहे. मी पाकिस्तानी आणि जगभरातील प्रेक्षकांसमोर ऑन एअर राजीनामा दिला आहे. हे टीव्हीवाले वेडे आहेत का? मला बाहेरचा रस्ता दाखवणारे हे कोण आहेत? अशा प्रकारे शोएब अख्तर याने या वाहिनीच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईवर कुऱ्हाड मारुन घेतली आहे.

शोएब त्या वेळी वादात अडकला जेव्हा त्यांने या वाहिनीवरील कार्यक्रमाच्या मध्यात आपल्या क्रिकेट विश्लेषक पदाचा राजीनामा देऊन निघून गेला. कारण, या वाहिनीवरील निवेदकाने त्याला बाहेर जाण्यास सांगितले. अख्तर म्हणाला मंगळवारी (दि.२६) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडचा टी २० वर्ल्ड कप मधील सामना सुरु होता. सामना पाकिस्ताने जिंकल्यानंतर सुरु असलेल्या कार्यक्रमात निवेदकाने शोएब अख्तरला वाईट व अपमानास्पद वागणूक दिली.

या नंतर शोएब अख्तर उठला त्याने मायक्रोफोन काढले आणि निघून गेला. कार्यक्रमाचा निवेदक नौमान नियाज याने शोएबला परत बोलवण्याचा प्रयत्न देखिल केला नाही. तसेच पुढे कार्यक्रम चालू ठेवला. पण, कार्यक्रमातील इतर पाहुणे सर विवियन रिचर्डस्, डेविड गोवेर, राशिद लतीफ, उमर गुल, आकिब जावेद आणि पाकिस्तानी महिला संघाची कर्णधार सना मीर हे देखिल आश्चर्य चकीत झाले.

या घटनेनंतर बुधवारी शोएब अख्तर याने ट्वीट करत पोस्ट लिहून घटनेचे स्पष्टीकरण दिले. अख्तर ट्वीट करुन म्हणाला, समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ येत आहेत. त्यामुळे मी विचार केला की, आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नौमान याने माझ्याशी असभ्य वर्तन केले आणि मला कार्यक्रम सोडून जाण्यास सांगितले.

मला राष्ट्रीय वाहिनीवर अपमानीत करण्यात आले : शोएब अख्तर

शोएब म्हणाला, ही अतिशय लज्जास्पद करणारी वेळ होती की तुमच्या सोबत सर विवियन रिचर्डस आणि डेविड गोवेर सारखे दिग्गज होते. तसचे काही समकालीन आणि वरिष्ठ सुद्धा तुमच्या सोबत कार्यक्रमाच्या सेटवर बसले होते. लाखो लोक तुमचा कार्यक्रम पहात होते. मी सर्वांना हे सांगून या पेचातून काढण्याचा प्रयत्न करत होतो की, आमच्या आपापसातील समजुतीने नौमानला खेचेन आणि नंतर नौमान विनम्रतेने सर्वांची माफी मागेल व आपण कार्यक्रम पुढे चालू ठेऊ. पण नौमानने माफी मागण्यास नकार दिला. यानंतर माझ्यासमोर कोणता पर्याय शिल्लक राहिला नव्हता.

शोएब अख्तर : नेमके काय घडलं होतं?

मंगळवारी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्यानंतर पाकिस्तान सरकारचे नियंत्रण असणारे पीटीव्ही वाहिनीवर सामन्याच्या समिक्षणाचा कार्यक्रम चालू होता. या कार्यक्रमा दरम्यान निवेदक नौमान याकडे अख्तरने लक्ष दिले नाही. त्यावेळी शोएब अख्तरने जलतगती गोलंदाज हारिस राऊफ विषयी बोलू लागला. यावेळी शोएबने पाकिस्तान सुपर लीग मधील फ्रेंचाइजी लाहोर कलंदर्स आणि त्याचे कोच आकिब यांचे कौतुक केले. यावेळी निवेदक नौमान याने शोएबला रोखण्याचा प्रयत्न केला आणि नौमान अख्तरवर चिडला. नौमान शोएबला म्हणाला की तुम्ही मझ्याकडे लक्ष देत नाही आणि मी हे सहन करणार नाही. निवेदक शोएबला म्हणाला, तुम्ही माझ्यासोबत वाईट वर्तणूक केली आहे, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही हा कार्यक्रम सोडून जा. यानंतर कार्यक्रमात जाहिरातीची विश्रांती घेण्यात आली. यावेळी अख्तर याने इतर सहकारी विश्लेषकांची माफी मागितली आणि घोषणा केली की पीटीव्ही स्पोर्टस् वाहिनीतून मी राजीनामा देत आहे.

Back to top button