Latest

जळगाव : पवन एक्सप्रेसच्या अपघातामुळे २१ गाड्या रद्द

अविनाश सुतार

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : मुंबईवरून मार्गस्थ झालेल्या दरभंगा पवन एक्सप्रेसचा लहवित स्टेशन जवळ आज (रविवार) दुपारी अपघात झाल्यामुळे २१ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ८ गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे.

मुंबहून नाशिकच्या दिशेने येत असलेली मुंबई दरभंगा पवन एक्सप्रेस लहवित स्टेशनजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास रुळावरून घसरली. या अपघातामुळे 11402,17612,17611,12145,12146,12111, 12112, 12143, 12105, 12106, 12137, 17058,12809, 12143, 12105, 12109, 12110, 11401 12109, 12110, 11401  या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेले आहे तर 22221, 12261, 12173, 12167, 12071, 12188, 12106, 12137 या गाड्यांच्या मार्ग मध्ये बदल करण्यात आलेला आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली .

तर अपघाताबद्दल काही माहिती पाहिजे असल्यास भुसावळ रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 5 वर मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासाठी 02582 222222 हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT