पुढारी ऑनलाईन डेस्क : मॉडेल आणि अभिनेत्री इप्सिता पती (Ipsita Pati) ही तिच्या हॉट फोटो आणि 'योगिनी' मालिकेमुळे चर्चेत आली आहे. इप्सिताने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. यामध्ये तिने मिस एशिया आणि मिस इंटरनॅशनलसारख्या ब्यूटी कॉन्टेन्स स्पर्धात मानाचा तुरा रोवला. याशिवाय ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असून फोटो शेअर करत असते. तर नुकतेच तिने बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनवर गंभीर लावले आहेत.
याबाबत इप्सिताने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, इप्सिता पतीने २०१० मध्ये I Am She Miss Universe या स्पर्धेत भाग घेतला होता. I Am She Miss Universe ही कंपनी सुष्मिता सेनची आहे. याच दरम्यान इप्सिताने सुष्मिता सेनवरच्या कंपनीवर मेंटली आणि फिजिकली टॉर्चर केल्याचा गंभीर आरोप लावला आहे. यात तिला पहिल्यांदा कंपनीने ३५ दिवसांत ८ किलो वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट बनवला आणि नंतर तिचे वजन कमी असल्याचे सांगत तिला नकार दिल्याचे म्हटले आहे.
इप्सिताने एका दिलेल्या मुलाखतीत, 'माझ्यासाठी ते ३५ दिवस जेलसारखे होते. मी भयभीत झाले होते. सुष्मिता सेनच्या कंपनीकडून मला ही अपेक्षा नव्हती. मी त्यांना माझे आदर्श मानले होते आणि त्याने माझा विश्वासघात केला. मी स्पर्धेत आलो तेव्हा माझे वजन ५३ किलो होते. पण ३५ दिवसांत ८ किलो वजन कमी करण्यासाठी मला उपाशी ठेवले. यामुळे मी अशक्त होवून आजारी पडू लागले. त्यानंतर वजन कमी असल्याचे सांगत मला स्पर्धेत बाहेर काढले. हे प्रकरण ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक याच्यांपर्यत्न पोहोचले होते.
इप्सिता पतीने २००८ मध्ये मिस साऊथ इंडिया टाइडल आणि २०१३ मध्ये मिस इंटरनॅशनल आणि मिस एशियाचा पुरस्कार जिंकला आहे. इप्सिताचा जन्म विशाखापट्टणम येथे झाला आहे. तिचे वडील एजीएम आणि चित्रकार आहेत, तर आई पूजा पती ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
इप्सिता सध्या आंध्र विद्यापीठातून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनची पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. १६ वर्षांची असताना तिने पहिल्यांदा रॅम्प वॉक केला होता. २०१० मध्ये ती मिस युनिव्हर्स इंडियाच्या फायनलमध्ये पोहोचली होती. याशिवाय सोशल मीडियावरदेखील तिचे हॉट फोटो पाहायला मिळतात. इंस्टाग्रामवर तिचे आतापर्यंत ८१.७ हजार फॉलोअर्स आहेत. याशिवाय ती फिटनेस फ्रिकदेखील आहे.
हेही वाचलंत का?