मान्सून उद्या महाराष्ट्रात; वायव्य भारत व्यापला | पुढारी

मान्सून उद्या महाराष्ट्रात; वायव्य भारत व्यापला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनने नियोजित तारखेच्या दोन दिवस आधीच वायव्य भारत व्यापला आहे. तो रविवारी (5 जून) महाराष्ट्रातील तळकोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षी वायव्य भारतात मान्सून 5 जूनच्या सुमारास दाखल होतो. मात्र यंदा 3 जून रोजी म्हणजे नियोजित तारखेच्या दोन दिवस आधीच त्याने वायव्य भारत व्यापला.

मान्सून महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ आला असून 5 जूनपर्यंत तो तळकोकणात व त्यापुढे तीन ते चार दिवसांत संपूर्ण राज्यात येईल, असा अंदाज आहे. शुक्रवारी 3 जून रोजी मान्सूनने पश्‍चिम बंगाल, सिक्‍कीमसह संपूर्ण वायव्य भारत व्यापल्याने त्या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात 4 ते 5 जूनदरम्यान पूर्व मोसमी पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्‍त केला होता. मात्र आता 6 व 7 रोजी राज्यातील कोल्हापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या भागात मुसळधार पावसाचा नवा अंदाज हवामान विभागाने 3 जून रोजी दिला आहे.

Back to top button