Latest

IPL Franchise : आयपीएलच्या फ्रँचायझींनी ‘या’ खेळाडूंना ठेवले कायम

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Franchise : इंडियन प्रिमीअर लीग २०२२ साठी दोन संघाचा समावेश झाल्याने मोठे बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधील ८ संघाच्या फ्रँचायझींनी ४ रिटेन खेळाडूंच्या नावाची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. याचबरोबर अहमदाबाद आणि लखनौ या दोन संघाचा समावेश होणार आहे. या संघासाठी खेळाडूंचे लिलाव होणार आहे.

८ फ्रँचायझींनी त्यांच्या ताफ्यात केवळ ४ संघांनाच कायम ठेवण्याची संधी आहे. १ ते ३० नोव्हेंबर हा एक महिन्याचा कालावधी फ्रँचायझींना देण्यात आला होता. यामुळे काही फँचायझींना कोणाला कायम ठेवायचे याबाबत निर्णय घेतला तर फ्रँचायझी संभ्रमात आहेत.

IPL Franchise : धोनी, विराट, रोहीत, बुमराह राहणार त्याच संघात

दरम्यान महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुनील नरेन, आंद्रे रसेल व ग्लेन मॅक्सवेल या खेळाडूंना आदी फ्रँचायझींनी त्यांना कायम केले आहे.

चेन्नई सुपर किंग्स – रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, मोईन अली

कोलकाता नाइट रायडर्स – सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्थी, वेंकटेश अय्यर

सनरायझर्स हैदराबाद – केन विलियम्सन

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल

दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, ॲनरीच नॉर्ट्झे

राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन

काय सांगतो रिटेशन रूल

बीसीसीआयकडून प्रत्येक फ्रँचायझीला ९० कोटींची मुभा दिली आहे. यातूनच त्यांना संघाची बांधणी करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर बीसीसीआयकडून ८ फ्रँचायझींन[ चार खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींची तरतूद केली आहे.दरम्यान त्यांच्या पगारातून कपात केली जाते. समजा एखाद्या फ्रँचायझीन[ चार खेळाडू रिटेन केले तर ४२ कोटी, तीन खेळाडू रिटेन केले तर ३३ कोटी, दोन खेळाडू रिटेन केल्यास २४ कोटी आणि एक खेळाडू रिटेन केल्यास १४ कोटी रुपये वजा केले जातील.

अनकॅप खेळाडूला रिटेन केल्यास ४ कोटी वजा होतील. चार खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्यासाठी १२, तिसऱ्यासाठी ८ आणि चौथ्यासाठी ६ कोटी मर्यादा आहे. तीन खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी ११ व तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी अशी मर्यादा देण्यात आली आहे. दोन खेळाडू रिटेन केल्यास १४ व १० अशी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या खेळाडूसाठी मर्यादा असणार आहे. एकच खेळाडू रिटेन केल्यास तो १४ कोटींपर्यंत त्याला रिटेन करता येणार आहे.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT